BJP Maharashtra | भाजपने उडवली उद्धव ठाकरेंची खिल्ली! व्यंगचित्रात शरद पवारांना ज्योतिषी तर संजय राऊत दाखवलं पोपटाच्या रुपात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राच्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) निकालानंतर महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) स्थापन झाले. काँग्रेस (Congress), शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी (NCP) या तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले. निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे तीन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र येतील असे कोणालाही वाटले नव्हते. तीन पक्षांचा हा प्रयोग जसा अनपेक्षित होता तेवढेच राज्यात घडलेले सत्तांतराचे नाट्य. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर (BJP Maharashtra) टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. त्यानंतर मुख्यमंत्री पद गेल्यानंतर देखील ते भाजपवर (BJP Maharashtra) टीका करत आहे. भाजपने याला टोमणे बॉम्ब नाव दिले आहे.

 

 

भाजपने दिलेल्या टोमणे बॉम्बचा संदर्भ घेत नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी भाजप महाराष्ट्र (BJP Maharashtra) या ट्विटर अकाऊंटवर एक व्यंगचित्र (Cartoon) पोस्ट करण्यात आलं आहे. यामध्ये उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Thackeray Group MP Sanjay Raut) यांची खिल्ली उडवण्यात आली आहे.

महाराष्ट्र भाजपने एक व्यंगचित्र पोस्ट केलं आहे.
या व्यंगचित्रामध्ये शरद पवार यांना ज्योतिषी (Astrologer) दाखवण्यात आले आहे.
त्यांच्या नावाची पाटी बारामतीकर ज्योतिष अशी दाखवली आहे.
2023 चं भविष्य सांगायला ते झाडाखाली बसले आहेत.
शरद पवारांना व्यंगचित्रात ज्योतिषी तर संजय राऊत यांना पोपटाच्या (Parrot) रुपात दाखवण्यात आलं आहे.
तर उद्धव ठाकरे शरद पवारांकडे हात दाखवत विचारत आहेत की ‘या वर्षात माझे टोमणे बॉम्ब चालतील का?’.
भाजपने नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पोसट करण्यात आलेलं हे व्यंगचित्र सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

 

 

Web Title :- BJP Maharashtra | bjp mocks uddhav thackeray shows sharad pawar as an astrologer in a cartoon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा