BJP MLA Ashish Shelar | ‘फोडा-झोडा सोडा, तुमचे मिशन मराठी माणसाला गाडा आणि आपला मॉल चालवा’, शिवसेनेच्या ‘कमळाबाई’च्या टीकेला भाजपचे प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेशी (Shivsena) समोरुन दोन हात करता येत नाहीत. मग फोडा-झोडा-मजा पहा. आपापसात झुंज लावा ही ब्रिटिश नीति (British Policy) अवलंबली जात आहे. शिवतीर्थावरच दोन तट पाडून कमळाबाईचा भाजप (BJP) आज आनंदाने नाचत आहे, पण ते स्वप्नरंजनात दंग आहेत, असं म्हणत शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे. याला भाजपचे आमदार अशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी ट्विट करुन प्रत्युत्तर दिले आहे. ‘फोडा-झोडा सोडा, तुमचे मिशन मराठी माणसाला गाडा आणि आपला मॉल चालवा’ असं म्हणत अशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

शिवसेनेने केलेल्या टीकेला भाजप नेते अशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी ट्विटच्या मध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. दुसऱ्यांना फोडा झोडा काय सांगता… पालिकेच्या मराठी शाळा (Marathi School) कोणी बंद केल्या? सचिन वाझेला (Sachin Vaze) वसुलीला कोणी बसवले? ख्यातकीर्त डॉ. अमरापूरकर (Dr. Amarapurkar) यांचा बळी कोणी घेतला? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात (Samyukta Maharashtra Fight) मराठी माणसावर गोळ्या झाडणाऱ्या काँग्रेससोबत (Congress) सत्तेत कोण बसले? फोडा झोडा सोडा, तुमचे तर मराठी माणसाला गाडा आणि आपला मॉल वाचवा हेच मिशन सुरु आहे, त्याचे काय? असं म्हणत शिवसेनेवर टीका केली आहे.

तीन लाख कोटीचे कमिशन कोणी खाल्ले?

मराठी माणसात फूट, ही आरोळी 100 टक्के झूट! महापालिकेत अमराठी कंत्राटदार, बिल्डर यांनीच पोसले… तीन लाख कोटीचे कमिशन कोणी खाल्ले? गिरणी कामगारांना (Mill Worker) उद्धवस्त कोणी केले? मराठी पोरांना फक्त वडापाव विकायला कोणी लावले? आणि हे वर्षानुवर्ष मराठीच्या नावाने गळे काढायला मोकळे… आता म्हणे पुढे चला? कुठे वसई की विरार? की आणखी त्याच्यापण पुढे, अशा शब्दात शेलार यांनी घणाघात केला.

पेंग्विन सेनेचे अग्रलेखातून दुसऱ्यावर खापर

अशिष शेलार यांनी हे मिशन नव्हे कमिशन, कर्तबगार नेते पक्ष सोडून गेले. बंधू ‘राजां’नी वेगळी चूल मांडली. खासदार (MP), आमदार, नगरसेवक कंटाळले. वाममार्गाने मिळवलेले मुख्यमंत्रीपद (CM) गमवावे लागले. हे सगळे अनर्थ एका अहंकारामुळे घडले, तरी पेंग्विन सेनेचे अग्रलेखातून दुसऱ्यावर खापर फोडण्याचे मिशन सुरूच… स्वत:चे अपयश झाकण्यासाठी आता मराठी कविता का आवळताय? आपल्या स्वार्थासाठी भगव्याला का बदनाम करताय, नाचता येईना अंगण वाकडे, स्वत:चे अपयश झाकायला आता पर्याय तोकडे, असे म्हणत शेलार यांनी बोचरी टीका केली आहे.

Web Title :-  BJP MLA Ashish Shelar | bjp ashish shelar slams shivsena uddhav  thackeray over saamana editorial

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PI Swati Desai Passed Away | पुणे शहर पोलिस दलातील वरिष्ठ निरीक्षक स्वाती देसाई यांचे निधन

Gold Price Today | सोने-चांदीच्या किंमतीत मागील आठवड्यातील घसरणीनंतर आज दिसत आहे तेजी, जाणून घ्या नवीन दर

Pune Pimpri Crime | पिंपरी चिंचवडमध्ये कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा टेम्पो पकडला