मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजप आमदाराची पहिली प्रतिक्रीया

बरेली : वृत्तसंस्था – दलित मुलाशी लग्न केल्यानं जीवाला धोका असल्याचा भाजप आमदाराच्या मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुलीचे वडील बितरी चैनपुरी जिल्ह्यातील भाजप आमदार आहेत. राजेश मिश्रा उर्फ पप्पू भरतौल असे या आमदाराचे नाव आहे. त्यांच्या मुलीनं दलित मुलाशी लग्न केल्याने पप्पू भरतौल यांनी मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली असून या धमकीचा व्हिडीओ बुधवारी रात्री व्हायरल झाला आहे. याप्रकरणी मुलीने वडीलांविरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल केली असून यामध्ये तिने भाऊ विक्की भरतौल आणि भावाचा मित्र राजीव राणा यांच्याकडून जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मुलीने पोलीस आयुक्तांकडे सुरक्षा मिळावी अशी मागणी केली आहे.

दरम्यान, एका न्युज चॅनलसोबत बोलताना मुलाचे वडील हरीश कुमार म्हणाले, याप्रकरणात अद्याप कोणतीही तक्रार पोलिसांमध्ये करण्यात आलेली नाही. सध्या आपण आपल्या मुलाच्या शोधात आहाेत. मात्र, आमदारांच्या लोकांकडून मुलाला मारण्याची धमकी आपल्याला देण्यात येत आहे.

तर या प्रकरणातील मुलीचे वडील आणि भाजपा आमदार राजेश मिश्रा यांनी सांगितले की, माझ्या विरोधात सोशल मीडियावर जे चालले आहे ते चुकीचे आहे. माझी मुलगी समजदार आणि सज्ञान आहे. तिला तिचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मी कोणालाही जिवे मारण्याची धमकी दिलेली नाही. तसेच माझ्या कोणत्याही माणसाने किंवा माझ्या परिवारातील व्यक्तीने त्यांना जिवे मारण्याची धमकी दिलेली नाही. मी माझ्या कार्यक्षेत्रात काम करत असून भाजपाकडून सुरु असलेल्या सदस्य नोंदणी अभियानात काम करत आहे. यापुढे मला काहीही सांगायचे नाही.

बरेली पोलीस महासंचालक आर.के.पांडे यांनी सांगितले की, साक्षी मिश्रा हिने एका दलित मुलाशी लग्न केल्याची माहिती व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे समजली. या प्रकरणात मुलीला आणि मुलाला सुरक्षा देण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे. मात्र, ते दोघे कोठे आहेत हे अद्याप समजू शकले नाही. तसेच त्यांनी देखील आपल्याला कळवले नाही. त्यांनी त्यांचा पत्ता कळवल्यावर त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस पाठवण्यात येतील.

आरोग्यविषयक वृत्त

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

पेरू खाल्यामुळं ‘हा’ आजार मुळापासून होतो ‘गायब’

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

You might also like