धक्कादायक गौप्यस्फोट ! ‘टोल माफी’साठी भाजपच्या ओळखपत्रावर हवी ‘या’ नेत्यांची छायाचित्रे

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे ओळखपत्र दाखवल्यास टोल नाक्यावर टोल घेतला जात नाही. कारण त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि आपला फोटो असतो असा धक्कादायक गौप्यस्फोट भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आणि इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी केला आहे. सांगलीतील मेळाव्यात त्यांनी हा गौप्यस्फोट केला.

मेळाव्यात काही कार्यकर्त्यांनी भाजपाचे ओळखपत्र दाखवूनही टोल नाक्यावर टोलमाफी दिली जात नसल्याची तक्रार केली. त्यावर सुरेश हाळवणकर यांनी हे ओळखपत्र टोलनाक्यावर चालत नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे; पण ओळखपत्रावर चंद्रकांत पाटील आणि आपला फोटो असल्याने टोल नाक्यावरील कर्मचारी काही तरी समस्या निर्माण होऊ शकते किंवा आपला टोल कंत्राट काढून घेतला जाऊ शकतो असा विचार करतात. त्यामुळे आमदार, नेते आणि काही कार्यकर्ते गेले म्हणून काय होते असा विचार करून ते सोडून देतात, असे सुरेश हाळवणकर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना सुरेश हाळवणकर यांनी कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करण्यास सांगितले. बुथ कमिटीचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने या मेळाव्यासाठी उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या मतदारसंघातील ११ हजार भाजपा कार्यकर्त्यांना ओळखपत्र दिल्याचे सांगितले.

दुखणे कमी करण्यासाठी औषधांशिवाय ‘हे’ उपायदेखील लाभदायक

सुगंधाने सुधारेल आरोग्य, एरोमॅटिक थेरपी करून पाहा

 ‘हे’ २२ सोपे घरगुती उपाय केल्यास त्वरित उजळेल चेहरा

‘किडनी’ फेल्युअर होऊ नये म्हणून करा ‘या’ उपाययोजना

‘अंडरआर्म डार्कनेस’ दूर करण्याचे ९ घरगुती रामबाण उपाय

 तजेलदार त्त्वचेसाठी ‘टोमॅटो’ उपयोगी, जाणून घ्या सामान्य गोष्टींचे ‘खास गुण’

‘या’ ५ सवयी लावून घ्या, तुम्ही वारंवार पडणार नाहीत आजारी

भाज्यांच्या सालीमध्ये सुद्धा असतात औषधी गुण, करा ‘हे’ उपाय

 

Loading...
You might also like