BJP MLA Sunil Kamble | आमदार सुनिल कांबळेंवर गुन्हा दाखल करा; पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे पोलिसांना निवेदन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन पुण्यातील भाजप आमदार सुनिल कांबळे (BJP MLA Sunil Kamble) यांची एक ऑडिओ क्लिप (Audio Clip) काल प्रचंड व्हायरल झाली. या ऑडिओ क्लिपमध्ये सुनिल कांबळे यांनी पुणे महानगरपालिकेच्या वरिष्ठ महिला अधिकारी सुष्मिता शिर्के (Sushmita Shirke) यांना शिवीगाळ केली आहे. यानंतर भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. या प्रकरणी सुनिल कांबळे (BJP MLA Sunil Kamble) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्याची मागणी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या (Pune City Congress Commitee) महिला पदाधिकाऱ्यांनी बंडगार्डन पोलिसांकडे (Bundgarden Police Station) निवेदनाद्वारे केली आहे.

भाजप आमदार सुनिल कांबळे यांनी पुणे महापालिकेतील (Pune Corporation) महिला अधिकारी सुष्मिता शिर्के यांना फोनवरुन शिवीगाळ केली.
त्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यामध्ये आमदार कांबळे यांनी अतिशय हीन दर्जाची भाषा आणि स्त्रिला लज्जा उत्पन्न होईल अशी शिवीगाळ केली आहे.
हा समस्त स्त्री जातीचा व मातृत्वाचा अपमान असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

तसेच या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात दहडपशाही करुन भ्रष्टाचार केल्याची शंका येत आहे.
याशिवाय एका महिलेला सार्वजनिकरित्या अपमानीत करणे, त्यांची मानहानी करणे व लज्जा उत्पन्न होईल अशी भाषा वापरणे असे गुन्हे कांबळे यांनी केले आहेत.
यामुळे सुनिल कांबळे यांच्यावर कलम 509, 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणात कडक कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

बंडगार्डन पोलिसांना (bund garden police) देण्यात आलेल्या निवेदनावर महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस सरचिटणीस संगीता तिवारी (sangeeta tiwari congress),
संघटक सचिव शोभना पण्णीकर (Shobhana Pannikar), झोपडपट्टी सेलच्या अध्यक्ष सुरेखा खंडागळे (Surekha Khandagale) यांच्या सह्या आहेत. यावेळी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

 

Web Title : BJP MLA Sunil Kamble | File a case against MLA Sunil Kamble; Statement of Pune City District Congress Committee to the police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

BJP MLA Sunil Kamble | आमदार कांबळे यांचा सर्वपक्षीय महिला पदाधिकाऱ्यांकडून निषेध, कारवाईची मागणी

Pune Rural Police | मोठी कारवाई ! पुणे विद्यापीठाची बनावट प्रमाणपत्रं बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Pankaja Munde | करुणा शर्मा प्रकरण : पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल; म्हणाल्या…