Pankaja Munde | करुणा शर्मा प्रकरण : पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल; म्हणाल्या…

बीड : पोलीसनामा ऑनलाइन –  Pankaja Munde | बीडमध्ये बहिणभावाचं राजकीय वाद कायम चर्चेत असतो. अनेक विषयावरुन आरोप-प्रत्यारोपाच्या सरी परस्परांवर कोसळताना दिसत असतात. यातच भाजप (BJP) नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी करुणा शर्मा प्रकरणावरून टिकास्त्र सोडलं आहे. ‘प्रशासन दावणीला बांधलेले असल्यास खोटे गुन्हे दाखल होत आहेत. तेच सुरू आहे. बीडमध्ये (beed) शासन आणि प्रशासन दोघे मिळून अन्याय करत आहेत, त्यामुळे न्याय कोणाकडे मागावा’ असं त्यांनी म्हटलं.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषेद घेण्यास आलेल्या करुणा शर्मा (Karuna Sharma) यांना अ‍ॅट्रॉसिटी (Atrocity) कायद्याअंतर्गत अटक करण्यात आले.
यानंतर राजकीय वाद चांगलाच चर्चेत आला. याच प्रकरणावरुन पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
त्यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘अ‍ॅट्रॉसिटी कायदा हा दलितांचे कवच कुंडल आहे.
दलित वर्गाच्या सुरक्षेसाठीच त्याचा वापर झाला पाहिजे मात्र, त्याचा दुरुपयोग होतोय हे अतिशय गंभीर आहे.
‘प्रशासन दावणीला बांधलेले असल्यास खोटे केसेस दाखल होतात. तेच सुरू आहे. असे त्यांनी म्हटलं आहे.

 

पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘बीड जिल्ह्यासह राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत.
याचा तीव्र संताप आणि निराशा मी व्यक्त करते. जिल्ह्यात देखील रोज घटना घडत आहेत, हे फार गंभीर आहे.
परळी जवळील सोनपेठमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला. भयानक आहे, मुलीला स्वतःचा जीव गमवावा लागला.
जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणी एक माफिया तयार झाले आहे. तसा पोलिसांचा धाक राहिला नाही.

दरम्यान, महिलावर अत्याचार झाला तर त्याच्यावर विशेष बैठक घेऊन न्याय दिला पाहिजे. जिल्हा नियोजनच्या बैठकीत फक्त बजेट वाटपाचा विषय न होता याही गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे.
जिल्ह्यामध्ये फिरताना महिलांना सुरक्षित वातावरण वाटावं असं काम करा.
असा अप्रत्यक्ष टोला पंकजा यांनी धनजंय मुंडे (Dhananjay Munde) यांना लगावला आहे.

 

Web Title : Pankaja Munde | pankaja munde criticizes ncp leader dhananjay munde over karuna sharma arrest in beed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

LPG Cylinder Update | जुन्या LPG सिलेंडरच्या बदल्यात घ्या नवीन फायबर ग्लास कम्पोझिट सिलेंडर, किंमत जवळपास सारखीच; जाणून घ्या फायदे?

Maharashtra Health Dept Exam | आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 167 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी