‘सुशिलकुमार शिंदे यांचे रेल्वेतले किस्सेसुद्धा आम्हाला माहीत आहेत’; ‘या’ नेत्याने केला माेठा गाैप्य स्फाेट

सोलापूर : पोलीसनामा आॅनलाईन – काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी आज सोलापूरात बोलताना भाजप खासदार शरद बनसोडे यांच्यावर सडकून टीका केली होती. याच टीकेला  शरद बनसोडे यांनी चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. स्लीव्हलेस घालून रेव्ह पार्टीत सापडलेल्यांनी माझ्यावर बोलू नये, असे वक्तव्य बनसोडे यांनी केलं आहे. सोलापूरात स्थानिक रस्ते विकास कामाच्या भाषणात प्रणितींनी बनसोडे बेवडे असल्याचा उल्लेख केला होता. कामं काँग्रेस करेल आणि आमची पाठ वळली की, ही कामं आम्ही केली असं भाजपा सांगायला सुरुवात करेल. असंही प्रणिती म्हणाल्या होत्या.

याच टीकेला प्रत्युत्तर देताना बनसोडे म्हणाले की, “‘मुंबईत काय काय चालतं, ते उघड करावं लागेल. सुशिलकुमार शिंदे यांचे रेल्वेतले किस्सेसुद्धा आम्हाला माहीत आहेत. स्लीव्हलेस घालून रेव्ह पार्टीत सापडलेल्यांनी माझ्यावर बोलू नये.” विशेष म्हणजे, “शेवटची वॉर्निंग प्रणिती ताई, वैयक्तिक टीका केलीत, तर तुमच्याही वैयक्तिक आयुष्यातले किस्से बाहेर काढले जातील”, असा इशाराही बनसोडे यांनी दिला.

निवडणूक जवळ आली की, राजकीय वारे जोरात वाहताना दिसते. आरोप-प्रत्यारोप दिसू लागतात. सोलापूरात झालेल्या कार्यक्रमात आज प्रणिती बोलत होत्या.  ‘माफ करा, पण तुमचे खासदार बेवडे आहेत’ अशा शब्दात प्रणिती शिंदेंनी शरद बनसोडेंवर नाव न घेता निशाणा साधला होता. इतकेच नाही तर  दारु पोहचवण्याच्या निर्णयाच्या चर्चेवरही त्यांनी सडकून टीका केली. आपल्या देशात मोदीबाबा नावाचा डेंग्यूचा मोठा डास आला आहे अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. होती. महत्त्वाचं म्हणजे, याच भाषणात त्यांच्या कचाट्यातून सहकारमंत्री सुभाष देशमुखही सुटले नाहीत. सुभाष देशमुखांच्या आरक्षित जागेवरील बंगल्यावरुन प्रणिती शिंदेंनी देशमुखांना लाज-शरम नसल्याचं वक्तव्य केलं. रस्ते विकास कामाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात प्रणिती शिंदे बोलत होत्या.

नेमकं काय म्हणाल्या प्रणिती शिंदे?

‘आत्ता तुम्ही पेपरमध्ये बघत असाल, यांचे दोन मंत्री, यांचं एकच काम आहे, एकमेकांशी भांडणं करा, त्यांचे गट सांभाळा, पेपरमध्ये आम्ही केलेल्या कामाची उद्घाटनं करा. म्हणजे आयत्या बिळात नागोबा. एवढंच यांचं काम आहे. हे स्वतः एक दमडी पण आणू शकले नाहीत सोलापूरमध्ये. किती? दोन मंत्री. एक बेवडा खासदार. माफ करा मला असे शब्द घ्यावे लागतात. पण आज महिला आहेत. पण दुसरं काय बोलणार? वाह रे मोदी तेरा खेल, सस्ती दारु महंगा तेल. तुम्हाला माहित आहे का पेपरमध्ये काय आलं? इकडे महिला हैराण आहेत. मोदी सरकारने घोषणा केली आम्ही दारु घरपोच देणार. अरे बाबा, इकडे रेशन घरपोच मिळत नाहीये. इथे लोक मरत आहेत. तुम्ही जेवण घरपोच देत नाही, पण दारु देताय? म्हणजे काय चाललंय?’