भाजप-शिवसेना म्हणजे तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना’ : नितीन गडकरी 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या भाजप आणि शिवसेना युतीवरून जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबत जेष्ठ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणतात की, भाजप आणि शिवसेना  म्हणजे’ तुझं माझं जमेना, तूझ्यावाचून करमेना’ असे आहे.दोन्ही पक्षांमध्ये  वाजपेयी असताना जसे संबंध होते तसेच आताही आहेत. महाराष्ट्र, मराठी लोकांच्या आणि देशासाठी आमची युती लाभदायक आहे, असे गडकरी म्हणाले. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नव्याने रणनीती आखावी लागणार आहे असेही गडकरी म्हणाले. एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीदरम्यान विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते.

पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालाचा खोल परिणाम भाजपावर पडताना दिसतो आहे. म्हणूनच आता भाजपाकडून मोठ्या सावधानतेने पावले टाकावी लागत आहेत. महाराष्ट्राचा विचार करिता भाजपला एकुलत्या एक मित्रपक्षाचा सहारा आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. महाराष्ट्रात झालेल्या  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजप शिवसेना युतीच्या जोरादार चर्चा रंगल्या आहेत. एवढेच नव्हे तर भाजपाला सत्तेत यायचे असल्यास कोणती भूमिका घ्यावी लागेल? प्रचार कसा करावा लागेल ?याबाबत भाजपा मध्ये खलबतं सुरु आहेत. अशी माहिती सूत्रांकडून समजते आहे.

२०१९ ला शिवसेना भाजपाबरोबरच असेल
२०१९ ला शिवसेना भाजपाबरोबरच असेल, असा दावा भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी केला आहे. २०१९ला भाजपा पुन्हा सत्ता मिळवेल, असा विश्वासही अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. भाजपाची शिवसेनेबरोबर युती होणार असून, लोकसभा निवडणुकीला आम्ही युती करूनच सामोरे जाऊ, असंही अमित शाह म्हणाले आहेत. अमित शहा मुंबई दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी युती बाबत भाष्य केले.

मोदीच होतील पुन्हा पंतप्रधान 
सध्या देशात महाआघाडीची मोठी चर्चा सुरु आहे याबाबत नितीन गडकरी  म्हणाले की, ही कमजोरांची  महाआघाडी आहे, १९७१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान झालेल्या इंदिरा गांधी यांनी सामूहिक विपक्षांचा सामना करत एकहाती सत्ता मिळवली होती. त्याप्रमाणेच मोदी पुन्हा एकदा विजयी होतील. कमजोर आणि पराभूत झालेल्या लोकांची ही आघाडी आहे. जे एकमेंकाचा सन्मान करत नाहीत.

आता युतीच्या प्रश्नावर शिवसेना कोणता निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भाजपा आणि शिवसेना युती होणार की नाही? कुणाची सत्ता येणार ? हे येणार काळच ठरवेल ?