भाजप लोकसभेसाठी सेलिब्रेटींना उतरवणार निवडणुक रिंगणात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

आगामी सार्वत्रिक निवडणुका कोणत्याही परिस्थितीत जिंकण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून बॉलिवूड कलाकार, क्रिकेटर अशा सेलिब्रेटींना मोठ्याप्रमाणात आगामी निवडणुकांमध्ये रिंगणात उतरविण्यावर भाजप नेतृत्व गांभिर्याने विचार करत आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेता अक्षयकुमार, क्रिकेटर वीरेंद्र सहवाग व कपिल देव यांना २०१९ साठी भाजपकडून संधी मिळू शकते.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a8485a08-c915-11e8-b57a-67663dc7fcd7′]

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित, अक्षयकुमार, रवीना टंडन, अनुपम खेर, भप्पी लहरी, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, कपिल देव, माजी लष्करप्रमुख दलबीरसिंह सुहाग अशा राजकारणाबाहेरच्या व्यक्तींना उमेदवारी देऊन निवडणुकीत यश मिळविण्याबाबत भाजपने चाचपणी सुरू केली आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप समर्थक असलेल्या एका ज्येष्ठ अभिनेत्याची मदत घेऊन त्याच्याकडून या अभिनेत्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सुत्रांकडून समजते. दिल्ली, मुंबई, हरयाणा आणि हिमाचल प्रदेशात २०१४ मध्ये भाजपला चांगले यश मिळाले होते.

परंतु, २०१९ मध्ये भाजपला पुन्हा अशाप्रकारे विजय मिळण्याबाबत साशंकता आहे. त्यामुळे सेलिब्रेटींना निवडणुक रिंगण्याचा चंग भाजपने बांधला आहे. दिल्लीत भाजपने गेल्यावेळी सातही जागा जिंकल्या होत्या; परंतु यावेळेस त्या कायम राखणे अवघड ठरणार असल्यामुळे चित्रपट कलावंत आणि क्रिकेटपटूंना मैदानात उतरवण्याचा विचार सुरू आहे. गौतम गंभीर आणि अक्षयकुमार यांना दिल्लीत, तर सेहवाग आणि कपिल देव यांना हरयाणातून उमेदवारी मिळू शकते, अशी माहिती सुत्रांनी दिली.

अवैध धंद्याविरोधात कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना निर्देश

भाजपने मागील लोकसभा निवडणुकीत हेमामालिनी, किरण खेर, परेश रावल, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, बाबूल सुप्रियो, मनोज तिवारी, ऑलिम्पिक रौप्यपदकविजेते राज्यवर्धन राठोड, माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांना मैदानात उतरवले होते. बॉलीवूडचे कलावंत आणि क्रिकेटपटूंच्या साह्याने शहरी मतदारांना पुन्हा एकदा आकर्षित करण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे.

[amazon_link asins=’B01I4RNPQ6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3b5e0f46-c91b-11e8-b6b1-a16eecc96972′]

मागील निवडणुकीत दिलेली आश्वासने भाजपने चार वर्षात पूर्ण केली नाहीत. त्यातच महागाई, पेट्रोल, डिझेलची दरवाढ, बेरोजगारी, मंदावलेली अर्थव्यवस्था, विविध भ्रष्टाचाराचे आरोप आणि बिघडलेली सामाजिक शांतता यामुळे भाजपला पुन्हा निवडणुका qजकणे आता सोपे राहिलेले नाही. यासाठी मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी सेलिब्रेटींना साकडे घालण्यात येत आहे. हेमामालिनी, परेश रावल, किरण खेर, मनोज तिवारी, बाबूल सुप्रियो, व्ही. के. सिंह यांना पुन्हा उमेदवारी यांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार आहे. मात्र, त्यापैकी काहींचे मतदारसंघ बदलले जाण्याची शक्यता आहे. तर बंडखोर शत्रुघ्न सिन्हांनी यंदा भाजपकडून लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

[amazon_link asins=’B01AD36M8C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6838093a-c91c-11e8-afab-23730e8606b6′]