BJP Vs NCP Sharad Pawar | भाजपाला मोठा धक्का! आणखी एका माजी आमदाराने केला रामराम, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

लातूर : BJP Vs NCP Sharad Pawar | शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अनेक मतदार संघातील राजकारण बदलले आहे. यामुळे आगामी निवडणुकांचा विचार करून अनेकजण आपली राजकीय दिशा बदलत आहेत. काही ठिकाणी गटबाजी वाढली आहे. लातूरमधील अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विनायकराव पाटील (Former MLA Vinayakrao Patil) यांनी भाजपाला रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. स्वत: विनायकराव पाटील यांनी हा निर्णय जाहीर केला. (BJP Vs NCP Sharad Pawar)

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात विनायकराव पाटील हे २९ ऑक्टोबर रोजी शदर पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करतील. पक्ष बदलण्याचे आमदारांचे सत्र अजूनही सुरुच असल्याचे विनायकराव पाटील यांच्या निर्णयामुळे स्पष्ट झाले आहे. (BJP Vs NCP Sharad Pawar)

भाजपामधील गटबाजीला कंटाळून पाटील यांना हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. ज्यांच्या बंडखोरीमुळे मागील निवडणुकीत विनायकराव पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला त्याच दिलीपराव देशमुखांना पक्षाने जिल्हाध्यक्ष बनवल्याने पाटील गटात अस्वस्थता वाढली होती.

गट तट वाढल्याने त्यांची भाजपामध्ये घुसमट होत होती. त्यातच सगळे विरोधक हे एकत्र आलेत हे लक्षात घेत
विनायकराव पाटील यांनी राष्ट्रवादीची वाट धरली आहे.

लातूरच्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून विनायकराव पाटील हे दोन वेळेस आमदार म्हणून निवडून आले.
ते राज्यमंत्री देखील होते. मागील आमदारकीच्या निवडणुकीत गटबाजीमुळे त्यांचा पराभव झाला होता.

विनायकराव पाटील यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे अहमदपूरचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे समर्थक
आमदार बाबासाहेब पाटील यांच्यासाठी आगामी निवडणूक अडचणीची ठरणार आहे.
बाबासाहेब पाटील हे मागील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले होते.
आगामी निवडणुकीत विनायकराव पाटील हे बाबासाहेब पाटलांसमोर मोठे आव्हान निर्माण करू शकतात.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Yuva Sangharsh Yatra-Rohit Pawar | आमदार रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा स्थगित (व्हिडिओ)