BJP Vs Shivsena | …म्हणून महाराष्ट्रात भाजपाने शिवसेना फोडली, भाजप नेत्याचा मोठा खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – BJP Vs Shivsena | महाराष्ट्रात शिवसेना आम्हीच फोडली अशी अप्रत्यक्ष कबुली आता भाजपाने दिली आहे. मात्र, ही कबुली देताना बिहारमधील (Bihar) संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार (Nitish Kumar) यांनाही, धोका दिल्याने अशी फोडाफोडी तुमच्या पक्षातही होऊ शकते, असा अप्रत्यक्ष इशारा बिहार भाजपाचे नेते (BJP Leader) आणि माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी (Sushil Modi) यांनी दिला आहे. नितीशकुमार यांनी बिहारमध्ये भाजपाला धक्का देत सत्तेतुन बाहेरचा रस्ता दाखवत जुन्या सहकारी पक्षांना जवळ केल्याने या राजकीय भूकंपाचे धक्के दिल्लीपर्यंत बसले आहेत. (BJP Vs Shivsena)

 

महाराष्ट्रातील राजकीय भूकंपात बंडखोरीमुळे शिवसेना हादरली होती आणि सरकार कोसळले, त्यानंतर भाजपा सत्तेत आली. मात्र, बिहारमध्ये नितीशकुमार यांनी केलेल्या राजकीय भूकंपानंतर भाजपा सत्तेतून बाहेर गेली आहे. सत्ता गेल्याने संतापलेल्या सुशील मोदी यांनी आरोप केला आहे की, नितीशकुमार यांनी भाजपाला धोका दिला आहे. (BJP Vs Shivsena)

 

नितीश कुमारांनी भाजपाला धोका दिला

सुशील मोदी म्हणाले, अमित शाहांनी फोन केला तेव्हा त्यांनी आरसीपी सिंह यांचे नाव दिले. त्यानंतर सिंह यांना मंत्री करण्यात आले. नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल पक्षाचा कोणता नेता मंत्री होतो यामुळे भाजापाला काहीही फरक पडत नाही. भाजपाने नितीश कुमार यांना जेवढा सन्मान दिला तेवढा सन्मान त्यांना राजद, काँग्रेससोबत मिळू शकणार नाही. 1996 पासून पाहिले तर, अटलबिहारी वाजपेयी असो किंवा नरेंद्र मोदींचे सरकार असो, भाजपाने त्यांना सन्मान दिला. त्या सन्मानालाच त्यांनी धोका दिला.

 

ज्यांनी धोका दिला त्यांचा पक्ष आम्ही फोडला

सुशील मोदी म्हणाले, नितीश कुमार म्हणतात आमचा पक्ष फोडण्याचा भाजपाचा प्रयत्न होता. मात्र, आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी 40 आमदार हवे आहेत. त्यांच्या पक्षाला भाजपाने फोडले असते तरी सरकार स्थापन झाले असते का ? आम्ही का त्यांचा पक्ष फोडू ? त्यांच्या पक्षात 44 – 45 आमदार होते तेव्हा आम्ही त्यांना मुख्यमंत्री केले. आम्हाला काही करायचे असते तर आम्ही तेव्हाच फोडाफोडी केली असती. मात्र, भाजपाने कधीही आपल्या मित्रपक्षाला धोका दिलेला नाही. ज्यांनी आम्हाला धोका दिला त्यांचाच पक्ष आम्ही फोडला.

 

महाराष्ट्रात शिवसेनेने धोका दिला म्हणून…

सुशील मोदी पुढे म्हणाले, महाराष्ट्रात शिवसेनेची भाजपासोबत युती होती.
मात्र, त्यानंतर शिवसेनेने धोका दिल्याने त्यांना त्याचा परिणाम भोगावा लागला.
राजद, काँग्रेस, जेडीयू पक्ष एकत्र आले तर लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना पराभूत करू असा तिन्ही पक्षांचा गैरसमज आहे.
ते हे विसरत आहेत की नरेंद्र मोदींची लोकप्रियता 2014, 2019 पेक्षाही अनेकपट जास्त आहे.

 

हे सरकार कोसळणार

सुशील मोदी यांनी नितीशकुमार यांना इशारा देताना म्हटले की,
त्यांनी कितीही ताकद लावली तरी ते मोदींना 2024 मध्ये पंतप्रधान बनण्यापासून रोखू शकणार नाहीत.
आम्ही बिहारमध्ये प्रचंड बहुमताने पुन्हा सत्तेत येऊ.
आज लिहून ठेवा, हे सरकार 2025 वर्षही पूर्ण करू शकणार नाही. त्याआधीच हे सरकार कोसळेल.

 

Web Title : –  BJP Vs Shivsena | sushil modi tell why bjp break shivsena in maharashtra amid bihar political crisis

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा