मुलीवर अत्याचार करणारा भाजपाचा ‘तो’ नगससेवक गजाआड

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी वणी पोलिसांनी भाजप नगरसेवकाला बेड्या ठोकल्या आहेत. धीरज पोते असे आरोपीची नाम आहे.

[amazon_link asins=’B0073C7IIK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ed63863c-8e3a-11e8-9613-c77335da40e5′]

अल्पवयीन मुलीवर सतत तीन वर्षे अत्याचार करणे, समाजमाध्यमावर बदनाम करण्याची धमकी देऊन खंडणी मागणे, तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत आरोपीवर मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती वरून, वणी येथील भाजपचा नगरसेवक असलेल्या धीरज पाते याने एका अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात खेचून तिच्यावर तब्बल तीन वर्षे सतत अत्याचार केला.एवढेच नाही तर तिचे फेसबुक खाते तयार करून समाजमाध्यमावर बदनाम करण्याची धमकी देत खंडणी मागितली. शेवटी या प्रकाराला कंटाळून मुलीने संपूर्ण कहानी आपल्या आईवडिलांना सांगितली.

वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी आरोपी भाजप नगरसेवकास अटक करून पांढरकवडा सत्र न्यायालयात हजर केले असता न्या. जोशी यांनी त्याची रवानगी तीन दिवसांसाठी पोलीस कोठडीत केली.

जाहिरात