महिलेच्या खूनातील आरोपी PM मोदींसह व्यासपीठावर, विधानसभेचं तिकीट देखील दिलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महिला शिक्षेकेच्या खुनाचा आरोप असलेल्या शशिभूषण मेहता यांना भाजपने झारखंड विधानसभेचे तिकीट दिले आहे. मेहता हे सध्या जामिनावर बाहेर आहेत. एका सभेदरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत एकाच मंचावर हजेरी लावल्याचे पहायला मिळाले. शशिभूषण मेहता या आधी झारखंड मुक्ती मोर्चामध्ये कार्यरत होते.

झारखंड मधील पंकी विधानसभा मतदार संघातून भाजपने मेहता यांना विधानसभेची उमेदवारी दिली आहे. आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एकाच मंचावर हजेरी लावल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सोशल मीडियावर मोदी आणि शशिभूषण मेहता यांचे फोटो व्हायरल होत असून एका गुन्हेगाराला मोदींनी स्टेजवर स्थान दिले याबाबत आता सोशल मीडियावर चर्च्यांना उधाण आले आहे.

काय आहे नेमके खून प्रकरण
शशिभूषण मेहता हे जामिनावर बाहेर असून भाजपने त्यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिल्यानंतर शिक्षिकेच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी आंदोलन करून या घटनेचा निषेद नोंदवला होता. मेहता हे ऑक्सफर्ड स्कुलचे संचालक आहेत आणि त्याच शाळेतील शिक्षिकेच्या खुना प्रकरणी त्यांना २०१२ मध्ये अटक करण्यात आली होती. शाळेच्या वॉर्डन सुचित्रा मिश्रा यांच्या खुनाचा आरोप मेहता यांच्यावर करण्यात आला आहे. ध्रुवा येथे गांधीआश्रमाजवळ सुचित्रा यांचा मृतदेह सापडला होता.

Visit : policenama.com