Blood Donation Camp In Pune | शहीद दिनानिमित्त धनकवडीत रक्तदान शिबिरासह विविध उपक्रमांचे आयोजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Blood Donation Camp In Pune | देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जिवाची बाजी लावणारे स्वातंत्र्यसैनिक भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव या क्रांतिकाऱ्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ साजरा करण्यात येणारा शहीद दिवस धनकवडी (Pune Dhankawadi) येथील अखिल मोहननगर मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीरासह विविध समाज उपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला. (Blood Donation Camp In Pune)

 

शहीद दिनानिमित्त अखिल मोहन नगर मित्र मंडळाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरामध्ये १०२ रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला तर यासोबतच “सन्मान धनकवडीकरांचा अभिमान देशाचा” या सन्मान सोहळ्यात आपल्या कार्यकर्तुत्वाने देशभरात नावलौकिक मिळविलेल्या स्थानिक कर्तुत्ववान व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्यात आला.यामध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेले आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री.उदय जगताप, महाराष्ट्र लोकसेवा आयोग अधिकारी महेश धुमाळ,सब लेफ्टनंट भारतीय नौसेना सार्थक जाधव, इंटरनॅशनल बाइकर्स सार्थक चव्हाण यांचा समावेश होता. तसेच गणेशोत्सवातील ऐतिहासिक एकत्रित गणेश मिरवणुकीत सहभागी झालेल्या धनकवडीतील नऊ मंडळाचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.या कार्यक्रमाची सांगता कौमी ऐकतेचा संदेश देण्याऱ्या जनाब साहिबा चिस्ती ग्रुपच्या देशभक्तीपर कव्वालीच्या कार्यक्रमाने झाली. (Blood Donation Camp In Pune)

धनकवडी गावचे दिर्घकाळ सरपंच राहीलेले बाप्पूसाहेब धनकवडे, धनकवडीचे पहिले आमदार भीमराव अण्णा तापकीर (MLA Bhimrao Tapkir),
धनकवडीचे पहिले महापौर दत्ताभाऊ धनकवडे, धनकवडीचे हवेली पंचायत समिती सदस्य सुनिलभाऊ खेडेकर
या मान्यवरांच्या हस्ते सन्मानार्थींना सन्मानित करण्यात आले. यावेळी मा. नगरसेवक विशाल तांबे,
किशोर उर्फ बाळाभाऊ धनकवडे,संतोष फरांदे, मा. नगरसेविका वर्षाताई तापकीर,अश्विनीताई भागवत,
मोहिनीताई देवकर,सामाजिक कार्यकर्ते अभिषेक तापकीर, गणेश पवार, चेतन मांगडे, अरुण राजवडे,
अप्पासाहेब परांडे, गीतांजलीताई जाधव,सचिन बदक, रणधीर गायकवाड, हर्षद धनकवडे यांचेसह रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Web Title :- Blood Donation Camp In Pune | Organized various activities including blood donation camp in Dhankavadi on the occasion of Martyrs Day

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | वानवडी गावात टोळक्याचा धुडगूस; वाहनांवर दगडफेक करुन केली नासधुस

Dhule Accident News | अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी अंत

Uddhav Thackeray Rally in Malegaon | उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी एकनाथ शिंदेचा धक्का, 3 माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश