Uddhav Thackeray Rally in Malegaon | उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी एकनाथ शिंदेचा धक्का, 3 माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Uddhav Thackeray Rally in Malegaon | ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी (दि.26) मालेगावमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे राज्याचे (Uddhav Thackeray Rally in Malegaon) लक्ष लागलं आहे. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shivsena) बंड केल्यानंतर मालेगावात ठाकरे गटाची (Thackeray Group) पहिलीच सभा होत असून यासाठी ठाकरे गटाकडून जय्यत तयारी केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटाचे माजी तीन नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करुन शिंदे गटात प्रवेश केला आहे.

 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Party) खासदार आणि नाशिकची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते संजय राऊत (MP Sanjay Raut) नाशिक जिल्ह्यात असतानाच शिंदे गटाने ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मालेगावात सभा (Uddhav Thackeray Rally in Malegaon) होणार असून ते नाशिकमध्ये येण्यापूर्वीच दोन माजी नगरसेवक व एका माजी नगरसेविका आणि काही कर्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. एकीकडे संजय राऊत आणि विनायक राऊत (MP Vinayak Raut) सभेच्या तयारीसाठी नाशिकमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून तळ ठोकून बसले असताना दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्यांनी शिंदे गटाची वाट धरली आहे.

 

मालेगावात तणाव, बंदोबस्त वाढवला

मालेगावात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. विशेष म्हणजे मालेगावचे आमदार दादा भुसे (MLA Dada Bhuse) हे देखील शिंदे गटात आहेत. त्यामुळे या सभेला महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र सभेपूर्वीच मालेगावात ठाकरे गट आणि शिदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर मालेगावात मोठा पोलीस बंदोबस्त (Malegaon Police) तैनात करण्यात आला आहे.

 

दरम्यान, उद्धव ठाकरे यांना रॅलीचा मार्ग बदलण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.
मात्र पोलिसांनी जरी मार्ग बदलण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी देखील आम्ही
त्याच मार्गाने येणार असल्याचे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सांगितले आहे.

 

 

Web Title :  Uddhav Thackeray Rally in Malegaon | eknath shinde set back for
uddhav thackeray before rally in malegaon 3 former corporators to join shivsena

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा