जेजुरी : कोथळे येथे आझाद प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन – पुरंदर तालुक्यातील कोथळे येथे आझाद प्रतिष्ठान च्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी कोथळे व परिसरातील 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
आझाद प्रतिष्ठान हे 37 वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. या वर्षी सार्वजनिक गणेश उत्सव अतिशय साध्या पध्दतीने शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून साजरा केला जात आहे.

मागील काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील काही रुग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता .सामाजिक बांधिलकी जपली जावी व या कोरोनाच्या लढाईत आपलाही काही वाटा असावा या हेतूने आझाद प्रतिष्ठान चे संस्थापक ॲड. धनंजय भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उदघाटन जेजुरी पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जेजुरी उद्योजक संघाचे अध्यक्ष डॉ. रामदास कुटे, कार्याध्यक्ष रवींद्र जोशी, जेजुरी देवस्थान चे माजी विश्वस्त नितीन राऊत, मुख्याध्यापक गोविंद लाखे,नीरा बाजार समितीचे संचालक धनंजय भोईटे, अशोक साबळे, कोथळेच्या उपसरपंच वंदना जगताप, मनीषा शिर्के आदी उपस्थित होते.

या रक्तदानासाठी हडपसर येथील अक्षय ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले. या शिबिराचे नियोजन आझाद प्रतिष्ठानचे संदिप जगताप, अजित भोईटे, सोमनाथ राऊत, आकाश शिळीमकर, अक्षय जगताप,तुषार काकडे, शिवाजी भोईटे, ओंकार भोईटे, समीर काकडे, विवेक जगताप, समीर जगताप, धनराज जगताप, रोहित भोईटे, कृष्णा राऊत, योगेश थोरात, प्रवीण भोईटे,महेश भोईटे, सागर जगताप आदींनी केले