Blood Group And Heart Disease | ‘या’ ब्लड ग्रुपच्या लोकांना लवकर घेरतात हृदयाचे आजार, ‘ही’ आहेत कारणे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Blood Group And Heart Disease | एक्सपर्टनुसार, अँटीबॉडी हा रक्त आणि पेशींच्या पृष्ठभागावरील एक असा चिकट पदार्थ असतो जो बाहेरून आलेले व्हायरस, बॅक्टेरिया आणि पॅरासाईट्सपासून शरीराचे रक्षण करतो. जेनिटिसिस्ट अँड लीड प्रॉडक्ट डेव्हलपमेंट सायंटिस्ट जॅम लिम म्हणतात, नॉन O ब्लड ग्रुप म्हणजे A, B आणि AB ब्लड ग्रुपमध्ये हृदयाशी संबंधीत आजारांचा धोका जास्त असतो. या पाठीमागचे खरे करण समजलेले नाही, परंतु काही लोक ब्लड क्लॉटिंग किंवा थ्रोम्बॉसिसला याचे कारण मानतात. (Blood Group And Heart Disease)

 

डॉ. जॅबलो यांचे म्हणणे आहे की, A, B किंवा AB च्या लाल रक्तपेशी आणि ज्या वाहिन्यांमधून ते वाहते, त्या चिकट असल्याने त्यामधून ब्लड फ्लो सहज होत नाही. संशोधक म्हणतात की, AB ब्लड ग्रुपच्या लोकांमध्ये कार्डियोव्हसक्यूलर डिसीज (हृदयसंबंधी आजार) चा धोका जास्त असतो. Blood Group A आणि B ब्लड ग्रुपमध्ये (Blood Group) याच्या तुलनेत कमी अँटीबॉडीज असतात.

 

एक स्टडी सांगतो की, ए आणि बी ब्लड ग्रुपच्या व्यक्तींच्या नसांमध्ये ब्लड क्लॉटची शक्यता 51 टक्के असते. त्यांच्या फुफ्फुसात ब्लड क्लॉटची शक्यता 47 टक्के आते. मेमोरियल केयरमध्ये कार्डियोलॉजिस्ट होआंग पी गुयेन म्हणतात की, टाईप ए ब्लड ग्रुपमध्ये हार्ट डिसीजचा धोका 6 टक्के, टाईप बी मध्ये 15 टक्के आणि एबीमध्ये सर्वात जास्त 23 टक्के असतो. (Blood Group And Heart Disease)

एक्सपर्ट सांगतात की, नॉन टाईप ओ ब्लड ग्रुप आणि हृदयाच्या आजारांच्या जोखमीतील संबंधाचे अनेक पुरावे आहेत. रक्तात वॉन विलेब्रँड फॅक्टर लेव्हल, कॉलेस्ट्रॉल लेव्हल आणि जास्त ब्लड क्लॉटची शक्यता यास दर्शवते. ओ ब्लड ग्रुपच्या लोकांमध्ये वॉन विलेब्रांड फॅक्टरचा स्तर थोडा कमी असतो.

 

मात्र, डॉ. जॅबलो हे सुद्धा म्हणतात की रक्त घट्ट करणारे कोणतेही कारण जसे की – डिहायड्रेशन,
औषधे किंवा ऑटो इम्यून इलनेस सुद्धा हृदयाच्या आजाराची जोखीम वाढवू शकतात.
यासाठी ब्लड टाईप केवळ लठ्ठपणा, जेनेटिक्स, डाएट, व्हिटॅमिनची कमतरता किंवा
एक्सरसाईजप्रमाणे कार्डियोव्हॅस्क्यूलर डिसिजला प्रोत्साहन देण्याचा एक कारक आहे. (Blood Group And Heart Disease)

 

Web Title :- Blood Group And Heart Disease | people of this blood group at high risk of heart diseases

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 2,680 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

PM Kisan Mandhan Scheme | खुशखबर ! शेतकर्‍यांना आता 2000 रुपयांशिवाय दरमहा मिळतील 3000 रुपये, जाणून घ्या कसा घ्यावा लाभ?

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 54 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी