Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 2,680 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत (New Cases) आज (रविवार) घट झाल्याचे दिसत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील आज वाढली आहे. तर दैनंदिन मृत्यूची संख्या कमी झाली आहे. राज्यात कोरोनाची (Coronavirus in Maharashtra) दुसरी लाट ओसरल्यानंतर रुग्णसंख्या कमी होत आहे. मगील काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या दोन हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. आज राज्यात 1 हजार 715 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच 2 हजार 680 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

 

राज्यात आतापर्यंत 64 लाख 19 लाख 678 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.39 टक्के आहे.
तसेच आज दिवसभरात 29 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत राज्यात 1 लाख 39 हजार 789 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.

सध्या राज्यात 28 हजार 631 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत.
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 10 लाख 20 हजार 463 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 91 लाख 697 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात सध्या 2 लाख 20 हजार 474 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 965 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. (Coronavirus in Maharashtra)

 

Web Title : Coronavirus in Maharashtra | 2,680 ‘corona’ free in the last 24 hours in the state, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

PM Kisan Mandhan Scheme | खुशखबर ! शेतकर्‍यांना आता 2000 रुपयांशिवाय दरमहा मिळतील 3000 रुपये, जाणून घ्या कसा घ्यावा लाभ?

Pune News | महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाच्या महासचिवपदी जयराज ग्रुपचे संचालक राजेश शहा यांची निवड

स्पोर्ट बाईकची आवड असेल तर 16 हजारात घरी आणा Yamaha FZ 25, इतका द्यावा लागेल मासिक EMI