Blood Pressure Level-Diabetes | डायबिटीज रूग्णांमध्ये ‘ही’ लक्षणे आहेत घातक, मृत्यूचा धोका होतो दुप्पट

ADV

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Blood Pressure Level-Diabetes | मधुमेहाला (Diabetes) सायलेंट किलर म्हटले जाते आणि हा एक असा प्राणघातक आजार आहे ज्यामध्ये ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) सतत मॉनिटर करणे खूप महत्वाचे आहे. टाईप-1 (Type-1 Diabetes) आणि टाईप-2 मधुमेहाच्या ( Type-2 Diabetes) रुग्णांनी दीर्घायुष्यासाठी ब्लड प्रेशर लेव्हल (Blood Pressure Level-Diabetes) मॅनेज करणे खूप महत्त्वाचे आहे. या समस्येमुळे मधुमेही रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो.

 

ADV

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या हायपरटेन्शन सायंटिफिक सेशन्स 2021 (American Heart Association’s Hypertension Scientific Sessions 2021) मध्ये सादर केलेल्या 21 वर्षांच्या अभ्यासानुसार, रात्रीच्या वेळी हाय ब्लड प्रेशर (High Blood Pressure) असलेल्या मधुमेही रुग्णांमध्ये मृत्यूचा धोका दुप्पट असतो ज्यांचा रक्तदाब (Blood pressure) रात्री स्थिर किंवा कमी असतो.

 

डॉक्टर सांगतात की, रात्री झोपताना आपला रक्तदाब कमी होतो. झोपताना रक्तदाब कमी होत नसेल तर त्याला ’नॉन डिपिंग’ (Non Dipping) असे म्हणतात, पण जेव्हा रात्रीच्या वेळी रक्तदाबाची पातळी दिवसापेक्षा जास्त वाढते तेव्हा त्याला ’रिव्हर्स डिपिंग’ (Reverse Dipping) म्हणतात. या असामान्य रक्तदाब पद्धतींमुळे टाइप 1 आणि टाइप 2 मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये हृदयविकार (Heart Attack Risk) आणि मृत्यूचा धोका (Death Risk) वाढू शकतो.

पिसा युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिन इन्व्हेस्टिगेटर (University of Pisa Medicine Investigator) मार्टिना शिरियाको (Martina Shiriako) म्हणतात, आमच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, 10 पैकी एक मधुमेही रूग्ण रिव्हर्स डिपिंगने ग्रस्त आहेत. या स्थितीत, रक्तदाब नियंत्रणाची काळजी न घेणार्‍या मधुमेही रुग्णांमध्ये मृत्यूचा धोका जवळजवळ दुप्पट होऊ शकतो. म्हणून, मधुमेहींनी असामान्य रक्तदाब पातळीबद्दल (Blood Pressure Level) डॉक्टरांना माहिती दिली पाहिजे. (Blood Pressure Level-Diabetes)

 

पिसा येथील 349 मधुमेही रुग्णांवर 1999 साली सुरू झालेल्या एका अभ्यासात अर्ध्याहून अधिक लोक रक्तदाब कमी न होण्याचे बळी असल्याचे आढळून आले.
तर रिव्हर्स डिपिंगच्या तक्रारी असलेल्या 20 जणांचा समावेश होता.
त्यांना आढळले की रिव्हर्स डिपिंग असलेल्या सुमारे एक तृतीयांश रुग्णांना कार्डियाक अ‍ॅटोनिक न्यूरोपॅथीची (Cardiac Autonomic Neuropathy in Diabetes)
तक्रार होती. हा एक असा आजार आहे जो मधुमेहामध्ये होतो,
ज्यामध्ये हृदय (Heart) आणि रक्तवाहिन्यांवर (Blood Vessels) नियंत्रण ठेवणार्‍या नसा खराब होतात.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Blood Pressure Level-Diabetes | high blood pressure at night can increase death risk in diabetes patients

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Medha Patkar-Bill Gates | ‘कोरोना वुहानच्या ज्या लॅबमधून निघाला त्याचा मालक बिल गेट्स’ – मेधा पाटकर

 

Sharvari Wagh Hot Photos | कतरिना कैफच्या वहिनीनं घातले इतके पातळ कपडे, लाईट पडताच दिसले सगळे अंतरवस्त्र; फोटो व्हायरल

 

Benefits Of Cycling | सायकलिंगचे फायदे ! मधुमेह अणि हृदयविकाराचा धोका होईल कमी