Blood Sugar | ‘या’ फळभाजीची पाने डायबिटीज जलद करते कंट्रोल, जाणून घ्या कसे करावे सेवन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Blood Sugar | मधुमेहाच्या रुग्णांसाठी ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित (Blood Sugar Level Control) ठेवणे गरजेचे असते. रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढल्याने मधुमेहाच्या रुग्णांना (Diabetes Patients) आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जसजसा मधुमेह (Diabetes) वाढत जातो तसतसे रुग्णाला (Blood Sugar) वारंवार लघवी होणे, निद्रानाश, चिडचिड, तणाव आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भूक जास्त लागते (Blood Sugar Controlling Tips).

 

ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) वाढल्यामुळे त्याचा परिणाम शरीराच्या अनेक भागांवर होतो. हाय ब्लड शुगरमुळे (High Blood Sugar) हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक, किडनी निकामी होणे (Heart Attack, Brain Stroke, Kidney Failure) आणि अंधत्व येण्याचा धोका वाढतो (Blood Sugar).

 

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी करा तोंडलीचे सेवन (Consumption Of Ivy Gourd For Controlling Diabetes) :

मधुमेहाच्या रुग्णांसाठी शुगर नियंत्रणात (Sugar Control) ठेवणे आवश्यक आहे. शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी घरगुती उपाय खूप प्रभावी आहेत. तज्ज्ञांच्या मते, मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी तोंडलीच्या पानांचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे (Consumption Of Ivy Gourd Leaves For Diabetes Control).

 

औषधी गुणधर्मांनी समृद्ध तोंडलीमध्ये भरपूर फायबर (Fiber) असते जे वजन नियंत्रित ठेवते, तसेच ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करते. एका अभ्यासानुसार, दररोज सुमारे 50 ग्रॅम तोंडली खाल्ल्याने तुमची ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित राहते.

 

संशोधनात झाला खुलासा (Research Reveals) :
मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी दररोज सुमारे 50 ग्रॅम तोंडलीचे सेवन केल्याने शुगरवर नियंत्रण ठेवता येते. बंगळुरूस्थित इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन हेल्थ अँड क्लिनिकल रिसर्चनुसार, तोंडलीची भाजी आणि त्याची पाने ब्लड शुगर लेव्हल कमी करू शकतात. अभ्यासात सहभागी असलेल्या मधुमेही रुग्णांना तोंडलीचे चूर्ण खाऊ घातल्यानंतर रुग्णांच्या ब्लड शुगर लेव्हलमध्ये लक्षणीय घट झाल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

मधुमेहाच्या रुग्णांनी आहारात करावा तोंडलीच्या भाजीचा समावेश (Diabetics should Include Ivy Gourd Vegetables In Their Diet) :

तोंडली ही फायबरने समृद्ध असलेली तंतुमय भाजी आहे जी ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

 

तोंडली शरीराला हायड्रेट ठेवते. उन्हाळ्यात या भाजीचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे.

या भाजीमध्ये खूप कमी कॅलरीज असतात, ज्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. टाईप 2 मधुमेहाच्या प्रतिबंध आणि उपचारांमध्ये वजन महत्त्वाची भूमिका बजावते.

 

तोंडलीच्या पानांमुळे कसा नियंत्रित होतो मधुमेह (How Ivy Gourd Leaves Control Diabetes) :
तोंडलीच्या पानांचे सेवन शुगरच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. तोंडलीच्या पानांमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म (Anti-Diabetic Properties) आढळतात.
हे गुणधर्म मधुमेह नियंत्रणात प्रभावी ठरतात.
मधुमेही रुग्णांनी दररोज सकाळी तोंडलीच्या पानांचे एक ग्रॅम चूर्ण खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते.

 

कसे करावे तोंडलीच्या पानांचे सेवन (How To Consume Ivy Gourd Leaves) :
तोंडलीची पाने व्यवस्थित धुवून वाळवावीत. पाने सुकली की मिक्सरमध्ये बारीक करून पावडर बनवा.
तयार पावडर सकाळी रिकाम्या पोटी दूध किंवा पाण्यासोबत सेवन करा. ब्लड शुगर लेव्हल दिवसभर नियंत्रणात राहील.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Blood Sugar | amazing benefits of kundru leafs to manage blood sugar level

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rajya Sabha Election Results-2022 | ‘देवेंद्र फडणवीसांना माणसं आपलीशी करण्यात यश’ – शरद पवार

 

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

 

Rajya Sabha Election Results | राज्यसभेच्या निकालावरून संभाजीराजेंच्या समर्थकांचा शिवसेनेला जोरदार टोला; म्हणाले – ‘आता कसं वाटतंय, गार गार वाटतंय’