Rajya Sabha Election Results-2022 | ‘देवेंद्र फडणवीसांना माणसं आपलीशी करण्यात यश’ – शरद पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Rajya Sabha Election Results-2022 | राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajya Sabha Election Results-2022) सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या संजय पवार (Shivsena Sanjay Pawar) आणि भाजपाच्या धनंजय महाडिकांमध्ये (BJP Dhananjay Mahadik) जोरदार लढत सुरू होती. त्यामध्ये आता धनंजय महाडिक यांनी बाजी मारली आहे. या निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अपक्षांना आपल्या बाजूने वळविण्यात भारतीय जनता पक्ष (BJP) यशस्वी ठरला आहे. अपक्ष आमदार आपलीशी करण्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना यश आलं. राज्यसभा निकालाने मला कोणताही धक्का बसलेला नाही”, असं पवार म्हणाले.

 

“महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) एकूण संख्येप्रमाणे मतदान झालं. तिन्ही पक्षातील एक मतंही फुटलं नाही. जी मतं फुटली आहेत ती अपक्षांची आहेत,” असं शरद पवार म्हणाले, तसेच, “6 वी जागा जी शिवसेनेने लढवली तिथे आमची गॅप पडत होती. मतांची संख्या कमी होती. पण, धाडस केलं आणि प्रयत्न केला, त्या प्रयत्नात अपक्षांची संख्या ही भाजपकडे अधिक होती आणि आमच्याकडे कमी होती. तरीही दोघांना पुरेशी नव्हती आणि त्यामुळे भाजपने आम्हाला पाठिंबा देऊ इच्छिणारे जे अपक्ष होते त्यांना आपल्या बाजूला घेण्यासाठी जी काही यशस्वी कारवाई केली त्यात फडणवीसांना यश आलं.” असं शरद पवार म्हणाले. (Rajya Sabha Election Results-2022)

पुढे शरद पवार म्हणाले, “चमत्कार झाला हे मान्य केलं पाहिजे.
त्यामुळे हा फरक पडला. नाहीतर ही जी आघाडी आहे त्या आघाडीच्या एकंदर संख्येप्रमाणे त्यांना मतदान झालेलं आहे.
त्यात वेगळं काही नसल्याचं,” ते म्हणाले. “राज्यसभा निवडणूक निकालानंतर मला स्वत:ला फार धक्का बसलेला नाही.
तुम्ही जर मतांची संख्या बघितली तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांचा उमेदवारांचा जो कोटा दिला, त्यात काहीही फरक पडलेला नाहीये.
फक्त एक मत प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांना जादा पडलं आहे आणि ते मत कुठून आलंय हे मला ठाऊक आहे.
ते या आघाडीचं नाही ते दुसऱ्या बाजूचं असल्याचंही,” ते म्हणाले.

 

दरम्यान, महाविकास आघाडीकडे विजयाचं आवश्यक संख्याबळ असूनही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांना फोडून महाविकास आघाडीला धूळ चारून तिन्ही जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आणले.
ऐन निवडणूक काळामध्ये फडणवीसांना कोरोनाची बाधा झाली होती.
मात्र, त्यांनी शांततेच्या काळात अधिकचा घाम गाळला, त्याचं फळ भाजपला तिसऱ्या जागेच्या विजयी रुपात मिळालं हे स्पष्ट होत आहे.

 

 

Web Title :- Rajya Sabha Election Results 2022 | ncp chief sharad pawar comment on maharashtra rajyasabha results 2022 mahavikas aaghadi devendra fadnavis

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा