BMC Mayor Kishori Pednekar | ‘राणीच्या बागेतील हत्तीच्या पिल्लाचं नाव ‘चिवा’ अन् माकडाचं नाव ‘चंपा’ ठेवू’ – महापौर किशोरी पेडणेकरांचं प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – BMC Mayor Kishori Pednekar | राज्याच्या राजकारणात भाजप (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) एकमेकांवर टीका करताना दिसत असतात. यानंतर आता राणीच्या बागेमध्ये जन्माला आलेल्या पेंग्विन (Penguin) आणि वाघाच्या बछड्याच्या नामकरणावरुनही भाजप आणि शिवसेना यांच्यात शीतयुद्ध पाहायला मिळत आहे. पेंग्विनच्या 2 पिल्लांना ऑस्कर (Oscar) आणि ओरिओ (Oreo) अशी नावे देण्यात आली आहेत. तर वाघाच्या बछड्यांचं नामकरण वीरा (Veera) असे करण्यात आले होते. पंरतु, यावरुन भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आक्षेप घेत टोला लगावला आहे. यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) यांनीही पलटवार केल्याचे पाहायला मिळाले.

 

”मराठीला फक्त पाट्यांपुरता भाव, युवराजांच्या पेंग्विनंच नाव मात्र इंग्रजीत,” असा टोला चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी लगावला होता.
यानंतर महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, ”तुम्ही आम्हाला मराठीत नाव ठेवा असंच सुचवलंच आहे.
तर राणीच्या बागेत हत्तीला लहान पिल्लू होईल असं वाटत आहे, त्याला आपण तुमच्या नावावरुन ‘चिवा’ असं नाव देऊ.
याशिवाय, राणीच्या बागेत एक माकड आहे, त्याला ‘चंपा’ असे नाव देऊन टाकू,” असं जोरदार प्रत्युत्तर पेडणेकर यांनी दिलं आहे.

दरम्यान, वीर जिजामाता भोसले उद्यानातील जन्माला आलेल्या नवीन पेंग्विनची नावं ऑस्कर आणि ओरिओ असे ठेवण्यात आलेय.
तसेच करिष्मा आणि शक्ती या वाघांच्या जोडीला झालेल्या मादी पिल्लाचे नाव वीरा ठेवण्यात आलेय.
यावरुन आता या दोन्ही पक्षात शीतयुद्ध रंगलं आहे.
चित्रा वाघ यांच्या टीकेला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
त्यामुळे आणखी हे वातावरण तापण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- BMC Mayor Kishori Pednekar | mumbai BMC mayor kishori pednekar hits back bjp chitra wagh over criticism over rani baug penguin and tiger name

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा