देशांतर्गत विमानप्रवासासाठी बोर्डिंग पासची गरज नाही ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्ठा

देशांतर्गत विमानप्रवास करणाऱ्यांना आता बोर्डिंग पासची आवश्यकताच भासणार नाही. केंद्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या नव्या योजनेच्या अंतर्गत आता देशांतर्गत प्रवासासाठी चेहराच बोर्डिंग पास असणार आहे. बोर्डिंग पासला ऐवजी चेहऱ्यावर प्रवाशांची ओळख पटविण्याची प्रणाली केंद्र सरकार लागू करणार आहे. सुरुवातीला या बायोमेट्रीक प्रणालीची अंमलबजावणी दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बेंगळुरू या चार प्रमुख विमानतळांवर करण्यात येणार आहे. या विमानळांवर योजना यशस्वी झाल्यास त्यानंतर टप्प्याटप्प्याने या सुविधेचा विस्तार केला जाईल.

कशी पटवणार ओळख?

फेस रिकग्निशन तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘बायोमेट्रिक सॉफ्टवेअर’चा वापर करून हि प्रणाली विकसित करण्यात येईल. या माध्यमातून प्रवाशांच्या चेहऱ्यांच्या बायोमेट्रिक तपशिलातून त्यांची ओळख पटविण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे प्रवाशांना सातत्याने बोर्डिंग पास, पासपोर्ट आणि अन्य कोणत्याही प्रकारची ओळखपत्रे जवळ बाळगण्याची अथवा ती दाखविण्याची आवश्यकता भासणार नाही.
जगभरातील विमानतळावर या प्रभावी प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. चेहरा स्कॅन केल्यानंतरच प्रवाशांना प्रवेश दिला जाणार आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये चेहऱ्याला जखम झाल्यास किंवा आणखी कोणत्याही प्रकारची इजा झाली तरी ही प्रणाली प्रवाशाचा चेहरा अचुक ओळखणार आहे हे विशेष आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’be1d935e-c878-11e8-8e51-610018be9e74′]

सध्या बोर्डिंग पासच्या तपासणीत खूप वेळ वाया जातो. याशिवाय विमानतळावर सुरक्षेवरही मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. मात्र, प्रवाशाच्या चेहऱ्याची ओळख पटवून सर्व माहिती मिळवण्यात येणार असल्याने तपासणीचा वेळ वाचणार आहे.

या सुविधेमुळे प्रवाशांना विमानतळावर कोणत्याही रांगेत उभारण्याची आवश्यकता भासणार नाही. या शिवाय बोर्डिंगची नोंदणीही आता पेपरलेस करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवासाची सुरुवात करताना प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही, असा दावा करण्यात येत आहे. बायोमेट्रिक तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रवाशांची ओळख पटविण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही अडथळ्यांविना विमानतळावर जाणे प्रवाशांना शक्य होणार आहे. त्यासाठी सातत्याने कोणतेही ओळखपत्र दाखविण्याची आवश्यकता भासणार नाही.

[amazon_link asins=’B075K83QJK,B0741GGKM4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’10124216-c879-11e8-af3d-339a2230fc86′]