अंगदुखीचे प्रकार किती ? काय असतात याची ‘लक्षणं’ ? जाणून घ्या ‘कारणं’ अन् ‘उपाय’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अनेकांना अंगदुखीचा त्रास होत असतो. याची तशी पाहिली तर अनेक कारणं आहेत. परंतु काहींना ही अंगदुखी अल्पकालीन असते. तर काहींना मात्र दीर्घकाळ याचा त्रास होत असतो. आज आपण याची कारणं काय आहेत, याची लक्षणं कोणती आहेत आणि यावर काय उपचार केले जातात तसेच याचं निदान कसं केलं जातं याची देखील सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

अंगदुखीची लक्षणं

1) शरीरातील विविध ठिकाणी किंवा भागांवर वेदना होणं
2) टेंडर पॉईंट्स दाबल्यानं वाढलेली वेदना
3) थकवा येणं
4) झोप मोड होणं
5) सकाळी अस्वस्थपणानं जाग येणं
6) सकाळी अंगात कडकपणा जाणवणं.
7) संवेदनाशुन्य आणि हातापायांना मुंग्या येणं
8) डोकेदुखी
9) चिंता

अल्पकालीन अंगदुखीची कारणं

1) आघात किंवा जखम
2) डिहायड्रेशन
3) हायपोक्लेमिया (कमी पोटॅशियमचे स्तर)
4) झोपेचा अभाव
5) तीव्र व्हायरल किंवा जीवाणूजन्य संसर्ग
6) अतिप्रमाणात शारीरिक श्रम

दीर्घकालीन अंगदुखीची कारणं

1) फायब्रोमायल्गीया – पूर्ण शरीरावर एकापेक्षा जास्त ठिकाणावर वेदना, ज्या स्पर्शानेही दुखतात.

2) मानसिक रोग – ताण, चिंता, निराशा

3) पौष्टीक घटकांची कमतरता -व्हिटॅमिन डी, बी 12 आणि लोह

4) तीव्र थकवा सिंड्रोम – तणाव किंवा अतिरीक्त शारीरिक कार्य नसतानाही दिवसभर सतत थकल्यासारखं वाटणं

5) ऑटोइम्युन रोग – रूमेटाईज आथ्रायटीस, मल्टीपल स्क्लेरोसिस, लूपस

6) तीव्र संक्रमण – क्षयरोग, एचआयव्ही, हेपेटायटीस बी

कसं केलं जातं याचं निदान ?

कधी कधी अंगदुखीचं निदान करणं कठिण असतं. तरीही वैद्यकीय इतिहास, काही रक्ताच्या तपासण्या आणि काही चाचण्या करून याचं निदान करणं शक्य आहे.

काय आहेत यावरील उपचार ?

याची कारणं निश्चित झाल्यावर त्यानुसार यावर उपचार केले जातात.

उपचारासाठी वापरलेली काही औषधं पुढीलप्रमाणे –

1) अॅनलजेसिक्स – पॅरासेटामोल किंवा नॉन स्टेरॉईडल अँटी इंफ्लेमेटरी ड्रग्स (डिक्लोफेनाक) सारख्या औषधांमुळं वेदना कमी केल्या जाऊ शकतात.

2) स्नायू रिलॅक्सेंट्स – काहीवेळा स्नायूंच्या घट्टपणामुळंही अंगदुखी होते. जर स्नायूंना शिथिलता मिळाली तरीही वेदना कमी होतात.

3) व्हिटॅमिन सप्लीमेंट्स – जर शरीरात पोषणतत्व कमी पडले असतील तर व्हिटॅमिन बी 12 किंवा व्हिटॅमिन डी घेतल्यास वेदना कमी होतात.

4) अॅक्सिओलायटीक्स किंवा अँटी डिप्रेंसंट्स – ही मुख्य औषधं नसतात. सामान्यत: या औषधांसाठी मनोवैज्ञानिकांच्या डॉक्टरांची शिफारस आवश्यकअसते. परंतु हे उपाचर मदत करू शकतात.

काही केसेस अशाही असतात ज्यात शरीराच्या वेदना या स्नायूंच्या घट्टपणाशी संबंधित असतात. अशा वेळी फिजिओथेरपी, अंक्युपंक्चर, मसाज किंवा इतर पर्यायी थेरपीतून लक्षणं कमी करण्यास खूप जास्त आणि चांगली मदत मिळू शकते.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.