Farmers Protest : दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी सरकारला दिला सल्ला ! नंतर डिलीट केलं Tweet

पोलिसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारच्या कृषी कायद्यां विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन असंच सुरू राहिल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता. याला अनेक सेलेब्सनंही पाठींबा दिला आहे. फेमस सिंगर रुपिंदर हांडा (Rupinder Handa), बॉलिवूड आणि पंजाबी सिंगर मिका सिंग, अ‍ॅक्ट्रेस हिमांशी खुराना, पंजाबी सिंगर दिलजीत दोसांझ, बॉलिवूड स्टार सोनू सूद (Sonu Sood) यांनीही या याला पाठींबा दिला आहे. बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांनीही ट्विट करत चिंता व्यक्त केली. सरकरानं यावर मार्ग काढावा असं ट्विट त्यांनी केलं होतं. परंतु अचानक त्यांनी आपलं ट्विट डिलीट केलं.

काय म्हणाले होते धर्मेंद्र ?

एका वृत्तानुसार, सरकारला विनंती आहे की, शेतकरी बांधवांच्या अडचणींवर काही मार्ग काढावा. कोरोनाच्या केसेस दिल्लीत वाढत आहेत ही खूप दु:खद बाब आहे. या ट्विटमध्ये त्यांनी त्यांचा एक फोटोही शेअर केला होता ज्यात ते खूप उदास दिसत होते. परंतु काही कारणानं त्यांनी नंतर हे ट्विट डिलीट केलं.

शेतकरी कुटुंबातून आहेत धर्मेंद्र

धर्मेंद्र शेतकरी कुटुंबातून आहेत. मूळचे ते पंजाबचे रहिवाशी आहेत. यामुळच त्यांना शेतकऱ्यांची चिंता वाटत होती. त्यामुळंच त्यांना वाटत होतं की यावर लवकरात लवकर मार्ग काढला जावा.

गुरुवारी (दि 3 डिसेंबर रोजी) कृषी कायद्यांवरील 39 आक्षेप शेतकरी नेत्यांनी केंद्रीय मंत्र्यांसमोर मांडले. यापैकी 8 आक्षेप असे होते ज्यावर पुनर्विचार आणि दुरुस्ती करण्याची तयारी मंत्र्यांनी दाखवली. इतकंच नाही तर शेतकऱ्यांचे आक्षेप मान्य असतील तर कायदे रद्द करवेत अशी मागणीही शेतकऱ्यांनी यावेळी केली.