Video : ‘फिटनेस क्‍वीन’ दिशा पाटनीने घेतले ‘ते’ इंजेक्शन ; व्हिडीओ सोशलवर ‘चालतो’ नव्हे ‘पळतो’

नवी दिल्ली : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि आपल्या सौंदर्याने लाखो चाहत्यांना घायाळ करणारी नॅशनल क्रश दिशा पाटनी तिच्या आगामी मलंग चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान जखमी झाली आहे. यासंबंधी एक व्हिडीओ सोशलमिडीयावर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेला हा व्हिडीओ दिशा पाटनीच्या फॅन्स क्लबने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दिशा पटानी जखमी झाल्यामुळे इंजेक्शन घेताना दिसून येत आहे. दिशाच्या या व्हिडिओवर तिचे चाहते उत्साहात प्रतिक्रिया देत आहेत. दिशाची जखम लवकरात लवकर बरी व्हावी याकरिता चाहते प्रार्थना करत आहेत.

दिशा पाटनीचा हा व्हिडीओ पोस्ट करून फॅन्स क्लबने लिहिले आहे की, मलंगच्या शूटिंग दरम्यान दिशा पटानी जखमी झाली आहे. एम. एस. धोनी चित्रपटातून पदार्पण करणारी दिशा पाटनी प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरली. या चित्रपटामधील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले. आता लवकरच दिशा अभिनेता आदित्य रॉय कपूर सोबत मलंग या चित्रपटात दिसणार आहे.

दिग्दर्शक मोहित सूरी यांच्या मलंग चित्रपटात दिशा पाटनी, आदित्य रॉय कपूर सोबत दिग्गज अभिनेता अनिल कपूर मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होईल. दिशाचे चाहते या चित्रपटाची खूप आतुरतेने वाट पाहत आहेत.

आरोग्य विषयक वृत्त-
नंबर वाढला तर चष्म्याची लेन्स नियंत्रित करा, बदलण्याची गरज नाही
रोग प्रतिकारशक्ती दुबळी का होते ? जाणून घ्या
हाडे बळकट बनवण्यासाठी ‘हे’ उपाय आवश्य करा
निरोगी हृदयासाठी योग्य व्यायाम आणि आहार महत्वाचा

Loading...
You might also like