बॉलीवूड अभिनेत्रीची ३ लाखांची फसवणूक

दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री ईशा शर्वाणी हिची दिल्लीतील तिघांनी ऑस्ट्रेलियन इन्कम टॅक्स अधिकारी असल्याचे सांगून तब्बल ३ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. दिल्ली पोलिसांनी या तिघा ठगांना अटक केली आहे.

ईशा शर्वाणी ही सध्या लग्नानंतर ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे राहते. एके दिवशी तिला एक फोन आला व फोन करणाऱ्याने आपण ऑस्ट्रेलियन इन्कम टॅक्स अधिकारी असून तुम्ही ५७ हजार ऑस्ट्रेलियन डॉलर इतका कर चुकविला आहे. तुम्ही हे पैसे तातडीने भरले नाही तर तुम्हाला अटक होऊ शकते, या फोननंतर त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी ईशा शर्वाणी हिने पैसे भरले. त्यानंतर तिने चौकशी केल्यावर आपल्याला फसविण्यात आल्याचे तिच्या लक्षात आले. तिने दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार केली.

याबाबत सायबर सेलचे पोलीस उपायुक्त अनीश रॉय यांनी सांगितले की, दिल्लीतून केल्या गेलेल्या फोनवरुन ईशा शर्वाणी यांची फसवणूक झाली होती. या प्रकरणी तिघा जणांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांकडे चौकशी केल्यावर त्यांनी ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या अनेक भारतीयांची माहिती घेतली असल्याचे दिसून आले. त्यामुळे ईशा शर्वाणीबरोबरच त्यांनी ऑस्ट्रेलियातील आणखी काही भारतीयांची फसवणूक केली असल्याची शक्यता आहे.

Visit – policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like