12 KM सायकल चालवून सेटवर पोहोचली रकुल प्रीत सिंह, Video व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्गातून रिकव्हर झालेली बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री रकुल प्रीत सिंह ( rakul preet singh) पुन्हा कामावर परतली आहे. याव्यतिरिक्त, ती तिच्या फिटनेसवरही खूप लक्ष देत आहे. सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असलेल्या रकुलने गुरुवारी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये ती सायकल चालवताना दिसत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये रकुलने चाहत्यांना संपूर्ण गोष्ट सांगितली आहे. रकुलने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “तर मी हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे की, सायकलिंग करत मी माझ्या चित्रपटाच्या शूटिंग सेटवर जात आहे. टाइम मॅनेजमेंट. 12 किमी. वर्कआउट रुटीन.” दरम्यान, रकुल लवकरच Mayday या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. या चित्रपटात अजय देवगन आणि अमिताभ बच्चन महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. रकुलने शेअर केलेला हा व्हिडिओ चाहते मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

दरम्यान, यापूर्वी रकुल प्रीतने एका वक्तव्यात म्हटले होते की, अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचे तिचे स्वप्न या चित्रपटाद्वारे पूर्ण होईल. ती म्हणाली, “मी यापूर्वी अजय सरांसोबत काम केले आहे आणि आता पुन्हा त्यांच्यासोबत काम करण्यास मी खूप उत्साही आहे.” ते फक्त माझे सहकारी अभिनेताच नाही तर दिग्दर्शकही असतील. जेव्हा मी अभिनेत्री होण्याचा विचार केला तेव्हा प्रत्येकाप्रमाणेच माझेही अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करायचे स्वप्न होते. आता शेवटी माझे स्वप्न पूर्ण होणार आहे.”

पुन्हा एकत्र दिसणार अजय-रकुल

अजय देवगन आणि अमिताभ बच्चन मेडे या चित्रपटाच्या माध्यमातून सुमारे 13 वर्षानंतर पुन्हा एकत्र काम करणार आहेत. अजय देवगनसोबत हा रकुलचा दुसरा चित्रपट असेल. याआधी ही जोडी ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटात दिसली असून या दोघांचेही चांगले कौतुक झाले.