प्रसिद्ध अमेरिकन टेनिस पटू एलिसन रिस्कच्या लग्नात वाजलं बॉलीवूडचं ‘ते’ गाणं, नाचून वधू ‘बेहाल’ !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – विंबलडन २०१९ मध्ये क्वॉर्टर फायनल पर्यंत पोहचणारी प्रसिद्ध अमेरिकी टेनिस प्लेयर एलिसन रिस्कने टूर्नामेंट संपल्यानंतर लगेच लग्न केले. तिने प्रसिद्ध टेनिस खिलाडी डेविस कप मधील टीमचा कॅप्टन असलेला आनंद अमृतराजचा मुलगा स्‍टीफन अमृतराजसोबत लग्न केले आहे. ते दोघे खूप दिवसांपासून एकमेकांसोबत वेळ घालवत होते. परंतु दोघांनी अधिकृतपणे लग्न केले आहे. लग्नाच्या प्रसंगी एलिसन रिस्कने बॉलीवूड गाण्यावर जोरदार डान्स केला.

अमेरिकी टेनिस प्लेयरचा बॉलीवूड गाण्यावर डान्स बघून सानिया मिर्झा आश्चर्यचकित झाली.
भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा देखील अमे‌रिकी टेनिस खेळाडूला बॉलीवूड गाण्यावर ठुमके लावतांना बघून आश्चर्यचकित झाली. सानिया मिर्झा विवाहित जोडप्याला शुभेच्छा देत म्हणाला की, ये ठुमके कमाल के हैं.

या गाण्याचा व्हिडीओ ट्विटरवर शेयर करत एलिसनने लिहिले की, ‘अब आधिकारिक तौर पर मैं एक अमृतराज हो गई हूं. मैं बेहद भाग्यशाली हूं कि मुझे स्टीफन अमृतराज जैसा इंसान मिला. मेरे सारे नये भारतीय फॉलोवर कहां हैं. मैं कुछ थोड़ा बॉलीवुडी होने की कोशिश की है और आपका दिल जीतने की भी.’ एलिसनने ‘बार-बार देखो’ च गाणं ‘नचले सारे बन ठन के’ या गाण्यावर खूप तयारी करून डान्स केला. तिच्यासोबत तिची एक साथीदार आणि नंतर परिवारामधील अनेक लोकांनी देखील या बॉलीवूड गाण्यावर डान्स केला.