आई झाल्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्मानं शेअर केली ‘ही’ पहिली पोस्ट !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि तिचा पती व टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) नुकतेच आईबाबा झाले आहेत. अनुष्कानं एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आई झाल्यानंतर आता 10 दिवसानंतर अनुष्कानं सोशलवर एक पोस्ट शेअर केली आहे. आई झाल्यानंतरची ही तिची पहिलीच पोस्ट आहे. सध्या ही पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे.

मंगळवारी (दि 20 जानेवारी) जेव्हा इंडियन क्रिकेट टीमनं ऑस्ट्रेलियाला गाबामध्ये त्यांच्या धरतीवर चित केलं तेव्हा अनुष्का तिच्या फीलींग शेअर करण्यापासून स्वत:ला आवरू शकली नाही. तिनं गाबा टेस्ट मॅचमध्ये भारतीय टीमच्या ऐतिहासिक विजयसाठी पूर्ण टीमचं अभिनंदन करत शुभेछा दिल्या आहेत.

अनुष्कानं तिच्या इंस्टावरून एक स्टोरी शेअर केली आहे. यात तिनं लिहिलं की, काय विजय आहे टीम इंडिया, वाह. हा विजय म्हणजे येणाऱ्या अनेक वर्षांपर्यंत प्रेरणा देणारा आहे.

भारताच्या या ऐतिहासिक विजयावर अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अक्षय कुमार, बॉबी देओल आणि सनी देओल सहित अनेक कलाकारांनी आपापल्या स्टाईलनं शुभेच्छा दिल्या आहेत.

अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं प्रोड्युस केलेली पाताल लोक ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वीच अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीज झाली आहे. या सीरिजचं खूप कौतुक झालं आहे. याशिवाय तिनं प्रोड्युस केलेला बुलबुल हा सिनेमाही नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे ज्याला चाहत्यांचं भरपूर प्रेम मिळालं. अ‍ॅक्टींगबद्दल बोलायचं झालं तर अनुष्का दीर्घकाळापासून सिनेमांपासून दूर आहे. तिचा परी हा सिनेमा रिलीज होऊन 2 वर्षे झाली आहे. ती सुई धागा या सिनेमात वरुण धवनसोबत दिसली होती. या सिनेमातील तिच्या अभिनयाचंही खूप कौतुक झालं होतं.