अनुष्काने दाखवली पती कोहलीला ‘विराट’ ताकद, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   बॉलिवूड अभिनेत्री आणि तिचा पती भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ही जोडी नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असतात. सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. अनुष्काने पती आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला आपली ताकद दाखवली आहे. तिने या क्षणांचे व्हिडिओ आणि काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अनुष्काने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये विराट कोणासोबततरी बोलत आहे. दरम्यान, अनुष्का मागे उभा राहते आणि त्याला उचलताना दिसत आहे. अनुष्काचा हा प्रयोग पाहून विराट आश्चर्यचकित होऊन ”ओ तेरी… दोबारा करना” अशी मागणी करतो. यानंतर, अनुष्का विराटला तु स्वतः मागे झुकू नको, असे सांगत त्याला पुन्हा उचलून आपली ताकद दाखवते. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियवर तुफान व्हायरल होत आहे.