मालयकाच्या वयावरून ‘ट्रोल’ करणाऱ्यांना अर्जुनकडून जोरदार प्रतिउत्तर

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलीवूड अ‍ॅक्टर अर्जुन कपूर चित्रपटाव्यतिरिक्त मलायका अरोरा सोबतच्या अफेरमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अर्जुनने मलायका आणि त्याच्या नात्याबद्दल मीडियासमोर सांगितले. त्याने एका मुलाखतीत सांगितले की, तो मलायका सोबत रिलेशनशिपमध्ये आहे आणि त्याला तिच्या वयाने मला काही फरक पडत नाही.

अरबाज सोबत डिवोर्स झाल्यानंतर मलायका आणि अर्जुन खूप दिवसांपासून डेट करता आहेत. त्या दोघांच्या वयामध्ये १२ वर्षाचं अंतर असल्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. महत्वाची गोष्ट म्हणजे मलायका अरोराचे वय ४५ आहे तर अर्जुनाचे वय ३३ आहे. त्या दोघांच्या अफेरला घेऊन चित्रपटसृष्टी मध्ये खूप चर्चा चालू आहेत. नुकतीच अर्जुनने सोशल मीडियावर जबरदस्त प्रतिक्रिया दिली ज्यांनी त्या दोघांमधील संबंधांची टीका केली.

त्याने सांगितले,  अशा लोकांना माझ्या आयुष्यात महत्व नाही. म्हणून मी त्यांच्या बद्दल बोलून त्यांना महत्व देऊ इच्छित नाही. एका मॅगझिनला नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत अर्जुन कपूर म्हणाला की, तो मलायकासोबत रिलेशनशिपमध्ये आहे आणि ही गोष्ट लपवणायचा त्याचा हेतु नाही. त्याने सांगितले की सध्या त्यांचा लग्न करायचा काही प्लॅन नाही.

खूप दिवसांपासून डेट करत आहेत

मलायका खूप दिवसांपासून अर्जुनला डेट करते आहे. लग्नाच्या प्रश्नावर अर्जुनने सांगितले की, मी एका तुटलेल्या परिवारातून आलेलो आहे. तरीसुद्धा माझा लग्नावर विश्वास आहे. आणि मी माझ्या अवती-भवती अनेक आनंदी कुटुंब पाहिले आहेत. परंतु मी चुकिचे पाऊल टाकू इच्छित नाही. जीवनातील चढ-उतारांमधील नातेसंबंधात आनंद असणे महत्वाचे आहे.