Photo : अर्जुन रामपालची ‘प्रेग्नंट’ गर्लफ्रेंड रस्त्यावर भेळपुरी बनवून घेताना झाली ‘स्पॉट’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला सध्या प्रेग्नंट आहे. सध्या ती तिचा प्रेग्नंसीचा काळ चांगला एन्जॉय करताना दिसत आहे. कधी गॅब्रिएला अर्जुनसोबत रेस्टॉरंटमध्ये स्पॉट होते. तर कधी ती फिरतानाही दिसत असते. सध्या ग्रॅबिएलाचा एक फोटो समोर आला आहे. जो व्हायरल होत आहे. या फोटोत ती रस्त्यावर भेळपुरी बनवून घेताना दिसत आहे.

प्रेग्नंसीचा हा काळ असा असतो की, कधीही काहीही खाऊशी वाटतं. बहुतेक गॅब्रिएलासोबतही असेच काहीसे झाले असावे. त्यामुळेच ती इकडे तिकडे न पाहता थेट भेळपुरीवाल्याकडे गेली. तिच्या लुकबद्दल बोलायचे झाले तर, तुम्ही फोटोत पाहू शकता की, ती खूपच कॅज्युअल आणि कंफर्टेबल कपड्यात दिसत आहे. साध्या वेशातही गॅब्रिएला खूपच सुंदर दिसत होती. यावेळी तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

तुम्हाला माहिती असेलच की, अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएलाचं लग्न झालेलं नाही. बहुतेक त्यांना बाळ झाल्यानंतर ते नात्याला पुढे नेण्याचा प्लॅन करत असावेत. हे अर्जुन रामपालचं तिसरं मूल आहे. याआधी त्याची आधीची पत्नी मेहर जेसियाकडून त्याला 2 मुली आहेत. तिसऱ्यांदा बाप होणाऱ्या अर्जुनने गॅब्रिएलासोबतचा फोटो शेअर करत ती प्रेग्नंट असल्याची बातमी दिली होती. गॅब्रिएलाच्या 6 महिन्यांच्या प्रेग्नंसीनंतर अर्जुनने ही माहिती सांगितली होती. मेहर जेसियाला यावर विचारले असता तिला काही प्रॉब्लेम नसल्याचे तिने सांगितले होते. कारण दोघेही आपापल्या आयुष्यात खूप पुढे गेले आहेत.

मासिक पाळी नियमीत वेळेवर येण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय, लवकर आणण्यासाठी ‘हे’ करा

‘ब्रेस्ट’ साइज कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय करा !

गर्भावस्थेत कोणत्या मसाल्यांचं सेवन करावं अन् कोणत्या नाही, जाणून घ्या

गर्भ राहण्यासाठी करा ‘हे’ ३ घरगुती उपाय

दररोज करा ‘या’ हेल्दी रुटीनला फॉलो अन् रहा निरोगी

मासिक पाळीमध्ये ‘सेक्स’ करणे सुरक्षित आहे का ? जाणून घ्या फायदे व नुकसान

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like