‘सिंगर’ मीका सिंगनं वाढदिवशीच राखी सावंतला केलं होतं जबरदस्तीनं Kiss, अनेकवर्षांनंतर सांगितलं यामागील कारण !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड सिंगर मीका सिंग आज (बुधवार दि 10 जून 2020) आपला वाढदिवस साजरा करत आहे. अनेक हिट गाणी देणाऱ्या मीकाचं नावं अनेकदा वादातही राहिलं आहे. मीका सिंगनं 14 वर्षांपूर्वी आपला वाढदिवस साजरा करताना असं काही केलं होतं की रातोरात याची चर्चा प्रत्येकाच्या ओठावर होती. मीकानं जबरदस्तीनं अभिनेत्री राखी सावंतला किस केलं होतं. परंतु मीकानं असं का केलं होतं हे तुम्हाला माहिती आहे का ? अनेक वर्षांनंतर खुद्द मीकानंच यामागील कारण सांगितलं होतं.

मीकानं एका मुलाखतीत बोलताना सांगितलं की, “मुंबईतील अंधेरीच्या एका पबमध्ये पार्टी होती. माझ्या वाढदिवसाच्या या पार्टीत मी काही निवडक लोकांनाच बोलावलं होतं. यात प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टर आशिष शेरवुड यांचाही समावेश होता. मी राखीला बोलावलं नव्हतं कारण तिची वर्तणुक मला माहिती होती. परंतु ती आशिषसोबत आली आणि माझ्यासोबत ओव्हरफ्रेंडली व्हायला लागली. मला काही फरक नाही पडला. मी माझं पार्ट एन्जॉय करत होतो. परंतु मी केक कापल्यांतरसारं काही बिघडलं.”

https://twitter.com/30Kumaar/status/1270707103246831616?s=20

मीकानं पुढं सांगितलं, “मला स्किन अॅलर्जी होती. तोंडाला केक लावण्यास मी सर्वांना मनाई केली होती. तरीही मी केक कापताच राखीनं जबरदस्तीनं मला केक लावला. मला खूप राग आला. तिला धडा शिकवण्यासाठी मी तिला सर्वांसमोर किस केलं. यानंतर राखीनं खूप गोंधळ घातला होता.

मीकाच्या लोकप्रिय गाण्यांबद्दल बोलायचं झालं तर आंख मारे, आंखियो से गोली मारे, चिंता ता चिता चिता, गो गो गोविंदा, 440 व्होल्ट अशी त्याची अनेक गाणी फेमस आहेत.