अभिनेत्री बिपाशा बसुनं शेअर केला ‘नो मेकअप’ लुक ! युजर म्हणाला – ‘म्हातारी झालीस’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसु आणि अभिनेता करण सिंग ग्रोवर बॉलिवूडमधील अनेक हॉट कपलपैकी एक आहेत. या हॉट कपलनं आपल्या नात्याबद्दल नेहमीच बिंधास्तपणा दाखवला आहे. दोघे पती-पत्नी सोशलवरही आपलं प्रेम खुलेआम व्यक्त करत असतात. अलीकडेच आता बिपाशा तिच्या नो मेकअप लुकमुळं चर्चेत आली आहे.

बिपाशानं अलीकडेच तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला ज्यात ती नोमेकअप लुकमध्ये दिसत आहे. यात वयाच्या हिशोबाने तिचे केस काहीसे पांढरे झाल्याचे दिसत आहेत. फोटोच्या कॅप्शनमध्येच तिनं हे सांगितलं होतं की, हे फोटो ब्राऊन गर्लचे आहेत.

बिपाशाचे हे फोटो समोर आल्यानंतर काहींना हे फोटो आवडले आहे. परंतु काहींनी मात्र नावे ठेवली आहेत. काहींनी तर म्हातारपणावरून कमेंट केली आहे.

हॉलिवूडमध्येही असे अनके सेलिब्रिटी आहेत ज्यांनी आतापर्यंत त्यांचा नो मेकअप लुकमधील फोटो शेअर केला आहे.

View this post on Instagram

Wildflower hunting

A post shared by Amber Heard (@amberheard) on

बिपाशा बसुच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच बिपाशा बॉलिवूडमध्ये वापसी करण्याऐवजी बंगाली सिनेमात एन्ट्री करण्याचा प्लॅन करत आहे. 2009 साली बिपाशाने बंगाली सिनेमा शोब चरित्रो काल्पोनिक मध्ये काम केले आहे. हा तिचा आतापर्यंतचा एकमेव बंगाली सिनेमा आहे. या सिनेमातील तिच्या अॅक्टींगची खूप स्तुती झाली होती.

View this post on Instagram

Agua 💧 #water #nomakeup

A post shared by Salma Hayek Pinault (@salmahayek) on

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like