दीपिका पादुकोणला ‘xXx’ नंतर का नाही मिळाला एकही हॉलिवूड प्रोजेक्ट ?, अभिनेत्रीनं केला ‘खुलासा’

पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोण हिनं 2017 मध्ये डेब्यू केला होता. हॉलिवूड स्टार विन डिजल सोबत तिनं xXx : The Return of Xander Cage या सिनेमात काम केलं. दीपिका आणि प्रियंका चोपडा या दोन्ही अभिनेत्रींनी एका वर्षाआधी हॉलिवूडमध्ये सुरुवात केली आहे. प्रियंका ड्वेन जॉनसन म्हणजे द रॉकसोबत बेवॉच सिनेमात दिसली होती. प्रियंका मात्र एकापाठोपाठ एक सिनेमे करताना दिसत आहेत परंतु दीपिका मात्र xXx नंतर एकाही हॉलिवूड सिनेमात दिसली नाही. अशात दीपिकाच्या हॉलिवूड प्रोजेक्टबद्दल अनेक अंदाज लावले जाताना दिसत होते.

खुद्द दीपिकानंच आता एका मुलाखतीत बोलाताना खुलासा केला आहे की ती इतर हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये का दिसत नाही. एक इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दीपिकाला विचारण्यात आलं की, तू हॉलिवूड सिनेमात का दिसत नाहीस. पुढे तू असंच करणार आहेस का. यावर दीपिका म्हणाली, “सिनेमांना इंटरनॅशनल किंवा इंडियन असं मी अजिबात पहात नाही. सिनेमा भावना मांडण्याचं एक माध्यम आहे. हा चान्स देशाच्या बाहेरून येत असेल तर ठिक आहे.”

दीपिकानं सांगितलं की, हॉलिवूडचं नाही तर देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून तिला चांगलं काम ऑफर झालं तर ती नक्की ते काम करेल. दीपिका म्हणते, मी जेंडर केज सिनेमा यासाठी केला होता कारण त्यात एक दमदार रोल मला मिळाला होता. तसंही मी हॉलिवूड प्रोजेक्ट्ससाठी जास्त प्रयत्न करत नाही.”