सुशांतच्या निधनावर बोलली अभिनेत्री स्वरा भास्कर, म्हणाली – ‘एखाद्याच्या मृत्यूचा वापर फायद्यासाठी करणं लज्जास्पद’ !

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. 34 वर्षीय सुशांत ब्रांद्र्याच्या माऊंट ब्लांच बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावर डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्याच्या निधानानंतर आता सोशलवर इनसाईडर्स-आउटसईडर्स, नेपोटीजम, बॉलिवूडमधील पॉलिटीक्स अशी अनेक मुद्द्यावर चर्चा रंगली आहे आणि वादही होत आहेत. अशात अभिनेत्री स्वरा भास्कर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात ती फिल्ममेकर करण जोहर याला भाई जातिवादावर प्रश्न विचारत आहे.

‘ही योग्य चर्चा नाही’

स्वरा म्हणते की, “आपण कठोर बोलायला हवं परंतु याची एक सभ्य पद्धत असते. अनेक लोक इतरांना दोष देत आहे. मला असं वाटतं की, सुशांतच्या करिअरमध्ये त्याच्यासोबत काय झालं यासाठी तुम्ही करण, आलिया भट, सोनम कपूर, यांना जबाबदार धरू शकत नाहीत. ही योग्य चर्चा नाही.”

‘हे लज्जास्पद आहे’

स्वरा म्हणते, “ज्या पद्धतीनं हे जे काही घडलं आहे ते खूप दु:खद आहे. मला राग या गोष्टीचा आहे की, काही लोक अल्टेरियर मोटिव्ससाठी सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सुरू झालेल्या वादाचा वापर करत आहेत. हे लज्जास्पद आहे. आपण सुशांतला आदर द्यायला हवा. तो एक जबरदस्त कलाकार होता.”

‘चर्चेचा फोकस मेंटल हेल्थ आणि डिप्रेशनवर असायला हवा’

स्वरा म्हणते, “सुशांतच्या निधनानंतर सुरू असलेल्या चर्चेचा फोकस मेंटल हेल्थ आणि डिप्रेशन सारख्या गंभीर विषयावर असायला हवा. तुम्ही कधी विचार केलाय का डिप्रेशन काय आहे ?”