गौरी खाननं केला ‘गौप्यस्फोट’; सांगितलं ‘सुपरस्टार’ची पत्नी होणं किती अवघड असतं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचे सर्वात फेवरेट मानले जाणारे कपल शाहरुख खान आणि गौरी खान एक असे कपल आहे ज्यांच्यावर चाहते खूप प्रेम करतात. अभिनेता शाहरुख खान आपल्या अभिनयामुळे सगळ्यांच्या मनावर राज्य करतो. गौरी सुद्धा काही कमी नाही. गौरी आपल्या जबरदस्त इंटीरियर डिजाइनिंगमुळे प्रसिद्ध आहे. नुकतेच गौरीने पुण्यामध्ये ‘ग्रैवितस रत्ना’ नावाचे बुक लॉंच केले आहे. या इव्हेंटमध्ये गौरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीसची पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत उपस्थित होती.

इव्हेंटमध्ये गौरी खानने सोशल मिडियावर शाहरुखबद्दल चर्चा केली. ती म्हणाली की, शाहरुख खानची पत्नी होण्याचे अनेक निगेटिव्ह पॉईंट्स आहेत पण मी मी त्यावर लक्ष देत नाही कारण मला वाटते की, त्याची पत्नी होण्याचे ही अनेक पॉझिटीव्ह पॉईंट्स आहेत.

गौरी पुढे म्हणाली की, ‘शाहरुख खानने डिजाईन्स लॉंच करण्यासाठी खूप मदत केली. तो माझ्या परिवारातील एक खास व्यक्ती आहे. तो एक चांगला अभिनेता आहे पण या व्यतिरिक्त तो चांगला पिता आणि पती आहे. मी एक नॉरमल जीवन जगत आहे जशी एखादी वर्किंग महिला असते तशी मी आहे. मला जितकी गरज असते मी तितकीच मिडियाची मदत घेते. मला स्पॉटलाइटमध्ये रहायला आवडते.’

किंग खान म्हणजेच शाहरुख खान हा फक्त भारतामध्येच नाही तर इंटनॅशनल लेवलवर सुपरस्टारच्या लिस्टमध्ये सामिल आहे. एवढेच नव्हे तर शाहरुख खान सर्वात जास्त कमावणाऱ्या कलाकारांच्या यादीमध्ये आहे.

आरोग्यविषयक वृत्त

एक्जिमा ‘या’ आजारावर घरगुती उपाय

लहान मुलांच्या खाण्यापिण्याच्या वेळेची ‘अशी’ घ्या काळजी

दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार

सिने जगत

अभिनेत्री ईशा गुप्ताचा ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकावर गैरवर्तानाचा आरोप

Video : रणवीर सिंहचा पहिला ‘ऑडिशन’ व्हिडिओ, नक्‍की पहा

Video : बेबो करिना कपूरचा पोलिसांच्या ड्रेसमधील व्हिडिओ ‘व्हायरल’

बहुजननामा

मॉब लिचींगच्या घटनांविरोधात बहूजन क्रांतीची निदर्शने !

आगामी विधानसभेत वंचित असलेल्या नेत्यांना ‘वंचित’चा मिळणार आधार

वडार समाजाचे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ‘दगड फोडो’ आंदोलन