Independence Day 2020 : देशभक्तीपर आधारीत ‘ती’ 5 गाणी, जी ऐकल्यानंतर अंगात संचारतो देशप्रेमाचा ‘उत्साह’ ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम : 15 ऑगस्ट 2020 रोजी भारताच्या स्वातंत्र्याला 74 वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्यसैनिकांचं स्मरण करणारी बॉलिवूडमध्ये आजवर अनेक गाणी आपण ऐकली आणि पाहिली देखील आहेत. सध्या कोरोना व्हायरस महामारीच्या काळात यावेळी स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाचं एक वेगळंच रूप असू शकतं. आपल्या सोशल डिस्टेंसिंगचंही पालन करत स्वातंत्र्य दिनाचा हा उत्सव साजरा करावा लागणार आहे.

बॉलिवूडमध्ये अशी काही गाणी आहेत ज्यांच्याद्वारे आपण स्वातंत्र्यसैनिंकाचं स्मरण करू शकतो. यातील काही गाणी जुनीच आहेत. मात्र काही गाणी ही अलीकडच्या काही वर्षातील आहे जी तरुणांमध्येही खूप फेमस असल्याचं दिसत आहे. काही गाणी तर अशी आहेत जी एरवी देखील तरुणांच्या ओठांवर खिळताना दिसत असतात. या गाण्यांनी सोशलवर देखील खूप लोकप्रियता मिळवली आहे.

1) तेरी मिट्टी – 2019 साली आलेला केसरी हा सिनेमा 1897 साली सारागढी मध्ये झालेल्या लढाईवर आधारीत आहे. अक्षय कुमार स्टार या सिनेमातील तेरी मिट्टी या गाण्याच्या माध्यमातून सैनिकांना श्रद्धांजली देण्यात आली आहे. हा सिनेमा आणि गाणं प्रेक्षकांना खूप आवडलं आहे. आजच्या तरुणांमध्ये हे लोकप्रिय असल्याचं दिसत आहे.

2) वंदे मातरम – 19 जून 2015 रोजी ABCD 2 हा सिनेमा रिलीज झाला होता. यातील वंदे मातरम हे गाणं तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

3) संदशे आते है – 1997 साली रिलीज झालेल्या बॉर्डर सिनेमातील संदेशे आते है देशभक्तीपर गीत आहे. याचं डायरेक्शन जे पी दत्ता यांनी केलं होतं. जावेद अख्तर यांनी हे गाणं लिहिलं होतं. अनु मलिकनं हे गाणं संगीतबद्ध केलं होतं. रूपकुमार राठोड आणि सोनू निगम यांनी हे गाणं गायलं होतं. या गाण्यातून भारतीय सैनिकांचं दु:ख व्यक्त करण्यात आलं आहे. सिनेमाच्या यशाच्या कारणांपैकी हे एक म्हणजे हे गाणं आहे.

https://youtu.be/NXZr9exURTg

4) ऐ मेरे वतन के लोगों – दिग्गज गायिका लता मंगेशकर यांनी या गाण्यातून शहिदांवर भाष्य केलं आहे. 1963 मधील भारत-चीन युद्धादरम्यान आपला जीव गमावणाऱ्या सैनिकांच्या स्मरणार्थ हे गाणं तयार केलं गेलं होतं. स्वातंत्र्यदिनी हे गाणं मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळतं.

5) भारत का रहने वाला हूं – हे गाणं 1970 मधील पूरब और पश्चिम सिनेमातील आहे. या सिनेमात अशोक कुमार, सायरा बानो, मनोज कुमार, प्राण, निरूपा रॉय, प्रेम चोपडा आणि विनोद खन्ना यांनी महत्त्वाच्या भूमिका स्विकारल्या होत्या. स्वातंत्र्यदिनी ऐकण्यासाठी हे एक महान देशभक्तीपर गीत आहे.