दुसर्‍या मुलीच्या जन्मानंतर गेली होती ‘डिप्रेशन’मध्ये, हेमा मालिनीची मुलगी ईशानं स्वतः सांगितलं

पोलीसनामा ऑनलाइन – ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांची मुलगी अ‍ॅक्ट्रेस ईशा देओल काही दिवसांपूर्वीच दुसऱ्यांदा आई झाली होती. तिच्या दुसऱ्या मुलीचं नाव मिराया आहे. आपल्या दोन्ही मुलींच्या जन्माच्या दरम्यान ईशा देओल फिल्मी दुनियेपासून दूर राहिली. सध्या ती आपलं मदरहुड एन्जॉय करत आहे. दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर ईशा एका आजाराची शिकार झाली. याबाद्दल सांगताना ती खूप इमोशनल झाली होती.

ईशा देओल म्हणाली, “दुसऱ्या मुलीला जन्म दिल्यानंतर मी पोस्टपार्टम डिप्रेशनची (पीपीडी) शिकार झाली होते. डिलीव्हरीनंतर एक महिला शारीरिकच नाही तर मानसिक आणि इमोशनल बदलांनाही सामोरं जाते. अनेक महिला या डिप्रेशनच्या शिकार होत असतात. अनेकदा हे लक्षताही येत नाही.” असं तिनं सांगितलं.

ईशानं ज्या आजाराबद्दल सांगितलं आहे तो आजार प्रेग्नंसीदरम्यानच्या हार्मोन्सच्या चढ उतारामुळं होतो. त्यालाच पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणतात. यामुळे महिलांमध्ये मूड स्विंग, उदासी, चिडचिड, रडण्याची इच्छा, मुलाला सांभाळेल की, नाही याची चिंता असे अनेक बदल होतात. हेमा मालिनी यांनी हे नोटीस केल्यानंतर त्यांनी ब्लड टेस्ट करण्याचा सल्ला दिला. एका महिन्याच्या आत ईशा ठिक झाली.

https://www.instagram.com/p/B8-dHzHnXvY/