IPL 2020 : फरहान अख्तर आयपीएल करणार होस्ट, सोबत येणार ‘तूफान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना काळात प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर क्रिकेट मेळावा भरणार आहे. उशिरा का होईना पण इंडियन प्रीमियर लीग १९ सप्टेंबर म्हणजेच शनिवारी सुरू होणार आहे. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे चाहत्यांना क्रिकेटसह बॉलिवूडचे ग्लॅमरही पाहायला मिळते. यावेळीही असेच काही घडणार आहे. याची सुरूवात क्रिकेट लाईव्ह शोसह होणार आहे. याची सुरुवात अभिनेता फरहान अख्तर करत आहे.

फरहान चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सच्या सामन्यापूर्वी क्रिकेट लाइव्ह शो होस्ट करेल. स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टारवर प्रसारित होणाऱ्या या शोमध्ये फरहान आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येत आहे. हा फरहानचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘तुफान’ आहे. यात फरहान एका बॉक्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचे पोस्टर बऱ्याच दिवसापूर्वी रिलीज केले गेले आहे, ज्यात फरहानचा जबरदस्त लूक पाहायला मिळाला आहे. आता हे पाहावे लागेल की, फरहान आज आपल्या चाहत्यांना एखादे सरप्राईज देऊ शकेल का?

स्टार स्पोर्ट्स क्रिकेट लाइव्हवरील आपल्या चित्रपटाविषयी फरहान अख्तरने म्हटले आहे की, ‘माझा आगामी चित्रपट ‘तुफान’वर काम केल्यानंतर ही भावना अधिक गंभीरतेने समजू शकतो, जो खेळाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे आणि चित्रपट त्याच धर्तीवर बनवण्यात आला आहे. हे महत्वाचे आहे, विशेषत: या कठीण परिस्थितीत, एका उत्तम उद्यासाठी आणि सर्व प्रकारच्या लढाई लढण्यासाठी आशावादी आणि तयार असणे महत्वाचे आहे.’ याखेरीज त्याने याबद्दल सांगितले की तो खूप उत्साही आहे.

क्रिकेट आणि बॉलिवूडमध्ये विलीनीकरण होण्याची ही काही पहिली वेळ नाही. आयपीएलमधील अनेक संघात बॉलिवूड सेलेब्सचे शेअर आहेत. शाहरुख खान कोलकाता नाइट रायडर्सचा सह-मालक आहे. तसेच प्रीती झिंटा देखील किंग्ज इलेव्हन पंजाबशी अशाच प्रकारे संबंधित आहे. याशिवाय रणवीर सिंगसह अनेक कलाकार अनेकदा या शोमध्ये दिसतात.

‘तुफान’ या चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केले आहे. याआधीही फरहान आणि राकेश मेहराची जोडी एकत्र दिसली आहे. या चित्रपटाची एक्सेल एंटरटेनमेंट प्रॉडक्शन आणि आरोएम्पी पिक्चर्स यांनी सह-निर्मिती केली आहे. तसे त्याचे निर्माते राकेश मेहरा आणि फरहान अख्तर दोघे आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like