‘कबीर सिंह’चा फॅन एकतर्फी प्रेमातून झाला ‘वेडसर’, पहिल्यांदा युवतीला मारलं नंतर स्वतः केली आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एखादा चित्रपट आवडला म्हणून त्या चित्रपटासाठी चाहते काय काय करतील याचा काही नेम नाही. नुकतंच शाहिद कपूरचा ‘कबीर सिंह’ प्रदर्शित झाला होता ज्यात तो मनमानी कारभार करणारा व्यक्ती होता. हा चित्रपट आणि शाहिदचा यातील अवतार एकाला एवढा आवडला की त्याने त्याप्रमाणे टिक टॉकवर व्हिडीओ बनवायला सुरुवात केली. मात्र हा कबीर फॅन खुनी निघाला.

टिकटॉक वर करत होता कबीर सिंहची नक्कल
उत्तर प्रादेशातील बिजनौर मधील अश्वनि कुमार टिक टॉक स्टार होता. ज्याला टिक टॉक व्हिलन आणि जॉनी दादाच्या नावाने सर्व लोक ओळखत असत. हा व्यक्ती कबीर सिंहचा चाहता असल्यामुळे त्याचे डायलॉग टिकटॉकवर व्हिडीओ बनवून टाकत असे. मात्र या व्यक्तीवर फ्लाइट अटेंडेंट निकिता शर्मा नावाच्या मुलीची एकतर्फी प्रेमातून हत्या केल्याचा आरोप आहे. डिसेंबरमध्ये या मुलीचे लग्न होणार होते.

‘जो मेरा नहीं हो सकता उसे किसी और के होने का मौका नहीं दूंगा’…  या कबीर सिंह मधील अतिशय फेमस डायलॉग टाकून आरोपीने टिकटॉकवर आपला एक व्हिडीओ शेअर केला होता जो टिकटॉक वर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता.

मुलीनंतर स्वतःला संपवले
एकतर्फी प्रेमामुळे जेव्हा आरोपीला समजले की निकिता शर्माचा विवाह होणार आहे तेव्हा त्याला खूप राग आला आणि त्याने रागाच्या भरात निकिताची हत्या केली. त्यानंतर अनेक दिवस पोलीस अश्वनी कुमारचा शोध घेत होते मात्र तो फरार होता. अखेर पोलिसांनी त्याला शोधले आणि समर्पण करण्यास सांगितले. त्यावेळी त्याने स्वतःला गोळी मारून आपला जीव संपवला.

दोन खून करून फरार होता अश्वनी
अश्वनी उर्फ जॉनी दादा यांनी दहा वर्षांपूर्वीच निकिताला आपल्या प्रेमाबाबत विचारले होते मात्र तिने नकार दिला होता. एवढेच नाही तर अश्वनी याने आपापल्या शेजारी राहणाऱ्या दोन चुलत भावांचा किरकोळ कारणावरून गोळी मारून खून केला होता.

कबीर सिंहचे दिग्दर्शक म्हणतात
याबाबत कबीर सिंह चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात मी ती मुलगी आणि तिच्या कुटुंबाबाबत विचार करून दुःखी झालो. मला मान्य आहे की प्रत्येक दिग्दर्शकाने चित्रपट बनवताना संवेदनशील गोष्टींबाबत विचार नक्कीच करायला हवा. तसेच माझ्या कोणत्याही चित्रपटात असे कृत्य केल्याचे मी दाखवलेले नाही असे रेड्डी यांनी यावेळी सांगितले.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी