व्हायरल झाला कार्तिक आर्यनचा ‘होळी सेलिब्रेशन’चा फोटो, कपडे काढून घातला ‘गोंधळ’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – होळीच्या सणाची उत्तर भारतात वेगळीच क्रेज पहायला मिळते. बॉलिवूड स्टार कार्तिक आर्यन सध्या भूल भुलैया 2 या सिनेमाच्या शुटींगसाठी उत्तर प्रदेशात आहे. सध्या लखनऊमध्ये असलेल्या कार्तिकच्या हाताला दुखापतही झाली आहे. सध्या कार्तिक होळीचा आनंद घेताना दिसत आहे.

कार्तिकनं त्याच्या कॉलेजच्या काळातील होळी सेलिब्रेशनचा फोटो सोशलवरून शेअर केला आहे. हा फोटो पाहून चाहतेही चक्रावले आहेत. कारण त्यांना कळतच नाहीये की, कार्तिक आर्यन नेमका कुठे आहे. कार्तिकचा फोटो पाहून चाहते हैराण झाले आहे. त्याच बदललेला लुक पाहून ते त्याला ओळखण्याचा प्रयत्न करत आहेत.

कार्तिक हा कॉलेज टाईमचा फोटो शेअर करत चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. फोटो शेअर करताना कार्तिकनं मजेदार कॅप्शनही दिलं आहे. त्याच्या कॅप्शननंही चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. कार्तिक आर्यनचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

कार्तिकच्या अनेक चाहत्यांनी त्याच्या या फोटोला लाईक केलं आहे. काहींना कमेंट करत त्यालाही होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कार्तिकसोबत फोटोत त्याची मित्र मंडळीही दिसत आहे.

कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 14 फेब्रुवारी 2020 रोजी त्याचा लव आज कल 2 हा सिनेमा रिलीज झाला. सिनेमातील सारा अली खान कार्तिकची केमिस्ट्री सर्वांनाच आवडली. लवकरच तो भूल भुलैया 2 या सिनेमात दिसणार आहे.