Amitabh Bachchan On Donations : चॅरिटीबाबत अमिताभबच्चन म्हणाले – ‘दान करण्याबाबत बोलत नाही’

नवी दिल्ली : बॉलीवुड कलाकारांनी केलेल्या चॅरिटीच्या बातम्या नेहमीच येत असतात. कोणत्याही नैसर्गिक संकटात अनेक कलाकार मोठ्याप्रामणात गरजूंना मदत करतात. कोरोना व्हायरसच्या संकटात अभिनेता सोनू सूदने गरिबांना मोठी मदत केल्याने तो सतत चर्चेत होता. अमिताभ बच्चन सुद्धा काहीवेळा चॅरिटी करतात, परंतु बिग बी चे म्हणणे आहे की ते केलेल्या दानाबाबत चर्चा करत नाहीत.

मीडियामध्ये नेहमी अमिताभ यांच्या चॅरिटीच्या बातम्या येत असतात. एका फॅनने याकडे त्यांचे लक्ष वेधले असता अमिताभ यांनी त्यास रिट्विट करत लिहिले की, – अरे भाई साहब, या सर्वाची गरज नाही. दान केल्याबाबत मी कधीही बोलत नाही. फक्त करायला पाहिजे. तुमचे प्रेम मी जाणतो. आभार.

अमिताभ बच्चन यांच्या ज्या चॅरिटीच्या कामांचा उल्लेख केला आहे, त्यामध्ये उत्तर प्रदेशातील शेतकर्‍यांचे कर्ज चुकवणे, बिहारमध्ये पूरग्रस्तांना मदत करणे, बिहारच्या शेतकर्‍यांचे कर्ज चुकवणे आणि टॉलीवुडच्या फिल्म वर्कर्सला आर्थिक मदत करण्याचा समावेश आहे.

कोरोना लॉकडाऊननंतर अमिताभ बच्चन सध्या कौन बनेगा करोडपतीचे शुटींग करत आहेत. अमिताभ स्वता सुद्ध कोरोना पॉझिटिव्ह झाले होते आणि आठवडाभर दवाखान्यात होते. बरे झाल्यानंत ते पुन्हा कामावर परतले आहेत.

नुकताच अमिताभ यांनी एका कर्मवीर स्पेशल एपिसोड शूट केला आहे. या स्पेशल एपिसोडमध्ये अशा व्यक्तींना किंवा संस्थांना बोलावले जाते, ज्यांनी समाजासाठी उल्लेखनीय काम केले आहे.

ते जी रक्कम जिंकतात, ती सुद्धा चॅरिटीमध्ये जाते. हा एपिसोड शूट करतानाचा अनुभव अमिताभ यांनी ब्लॉगवर लिहिला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like