‘बीच बेबी’ मौनी रॉयने शेअर केले बर्थडे व्हॅकेशनचे ‘बोल्ड’ फोटो !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अक्षय कुमारच्या गोल्ड या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणारी अभिनेत्री मौनी रॉय सध्या थायलंडमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. शनिवारी 28 सप्टेंबर रोजी ती 34 वर्षांची झाली. सध्या थायलंडमध्ये ती बर्थडे व्हॅकेशनचा आनंद घेत आहे. मौनी नेहमीच आपले फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. यावेळी तिने व्हॅकेशनचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

मौनी रॉय सध्या बीच बेबी बनली आहे. मौनीचे समुद्र किनाऱ्यावरील अनेक फोटो याआधीही तिने शेअर केले आहेत. थायलंडच्या बीचवर मौनी एक से बढकर एक पोज देताना दिसत आहे. मौनीचा हा बोल्ड अंदाज चाहत्यांना खूपच भावला आहे. मौनी आपल्या सेक्सी अंदाजाने नेहमीच चाहत्यांना भुरळ घालत असते. मौनीच्या सध्या समोर आलेल्या फोटोंची खास बात अशी की, फोटोंमध्ये मौनी पिंक कलरच्या बिकीनीत दिसत आहे. पिंक बिकीनीत मौनी खूपच हॉट आणि बोल्ड दिसत आहे. पिंक कलर तिला खूपच सूट करत आहे.

मौनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, लवकरच ती मेड इन चायना या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलरला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यात ती राजकुमार राव सोबत काम करताना दिसणार आहे. याशिवाय ती जॉन अब्राहमसोबत रोमियो अकबर वॉल्टर या सिनेमातही दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/B21tOvBgqxz/