पूजा बत्राने शेअर केले थ्रोबॅक फोटोज्, पती नवाब शाहने दिली ‘ही’ कमेंट

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री पूजा बत्रा ही तिच्या फिटनेसवरून सतत चर्चेत असते. ती जिम, पार्कमध्ये एक्सरसाईज करतानाचे फोटोज् फॅन्ससोबत शेअर करते. त्यानंतर आता पूजा बत्राने तिचे थ्रोबॅक फोटोज् शेअर केले आहेत. त्यामध्ये ती व्हाईट कलरच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. स्वीमिंग पूलमध्ये आनंद लुटताना दिसत आहे. तिने घातलेल्या लाल कलरच्या इअररिंगमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे.

पूजा बत्राने इन्स्टाग्रामवर तिचे हे फोटोज् शेअर केले आहेत. यामध्ये तिने लिहिले, की मी माझा स्वत: मार्ग निश्चित करते. तिने शेअर केलेले हे फोटो तिच्या चाहत्यांना चांगलेच आवडले आहेत. या फोटोंना हजारो लाईक्स मिळाल्या आहेत. त्यानंतर अनेक लोक कमेंटवर प्रतिक्रिया देत आहेत. त्यानंतर तिचा पती नवाब सिंह यानेही इमोजी टाकून कमेंट केली आहे.

पूजा बत्राने इन्स्टाग्रामवर जे फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये ती योगा करताना दिसत आहे. ती शीर्षासनाच्या अवस्थेत दिसत आहे. हा फोटो शेअर करताना तिने विशेष कॅप्शनही दिले आहे. दरम्यान, पूजा बत्राने 1993 मध्ये ‘मिस इंडिया’चा किताब जिंकला होता. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळू लागल्या आहेत.