बिग बॉस 13′ मध्ये भाईजान सलमानसोबत राखी सावंत ?

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – बॉलिवूडमध्ये कायमच वादाच्या भोवऱ्यात असलेली राखी सावंत सोशल मिडियावर सध्या चांगलीच चर्चेत आहे. राखीचे नवे गाणे छप्पन छुरी रिलिज झाले आहे. त्यानंतर राखी याचे प्रमोशन करत आहे. याच दरम्यान राखीने एक व्हिडिओ पोस्ट केला आणि म्हणाली की, ती बिग बॉस 13 मध्ये दिसणार आहे. राखीने सांगितले की बिग बॉसच्या ओपनिंग एक्टमध्ये मी परफॉर्म करणार आहे. लवकरच रिहर्सल सुरु करेल. राखी म्हणाली की मी कल्पना देखील करु शकत नाही, आता माझे गाणे हिट होण्यासाठी कोणीही नाही अडवू शकतं.

राखीने लिहिले आहे की, चाहत्यांनो, आता तुम्हा सर्वांसाठी एक चांगली बातमी आहे. धन्यवाद सलमान खान, एक आनंदाची बातमी मी तुम्हाला सांगते की, मी माझ्या छप्पन छुरी गाण्यावर बिग बॉसमध्ये ओपनिंग एक्ट करणार आहे. यापेक्षा मोठी गोष्ट असू शकत नाही, धन्यवाद सलमान मला सपोर्ट करण्यासाठी. धन्यवाद बिग बॉस, धन्यवाद कलर्स टीव्ही.

राखी म्हणाली की, सर्वांने खूप सारे धन्यवाद, मी माझे छप्पन छुरी सॉन्ग सलमान खान बरोबर परफॉर्म करणार आहे. मागील अनेक सिजनमध्ये मी सलमान खान बरोबर परफॉर्म केले आहे. मी आजच सलमान खान आणि कलर्सला मेसेज केला, ते यासाठी सहमत आहेत.
राखी सावंतने बिग बॉसच्या सीजन 1 मध्ये सहभाग घेतला होता. त्यात ती चांगलीच चर्चेचा विषय बनली होती. या शो नंतर तीचे चाहते वाढले. यानंतर राखी अनेक सीजनमध्ये गेस्ट म्हणून गेली होती. त्यानंतर आता पुन्हा राखी बिग बॉसमध्ये परफॉर्म करताना दिसेल.