‘भाईजान’ सलमानच्या ‘गिफ्ट’ प्रकरणावर रानू मंडल यांनी पहिल्यांदाच दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – हिमेश रेशमिया याच्यामुळे प्रकाशझोतात आलेली राणू मंडल हिच्या गाण्यांनी सगळीकडे धूम चालवली आहे. त्यानंतर तिला सलमान खान हिने 55 लाख रुपयांचा एक फ्लॅट आणि गाडी भेट दिल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगत होती. मात्र आता यावर स्वतः राणू मंडल यांनी खुलासा केला असून त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.

एका मुलाखतीत यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आल्यानंतर यावर बोलताना राणू मंडल यांनी सांगितले कि, जर सलमान खान यांनी मला घर आणि गाडी दिली असती तर त्यांनी सर्व समोर येऊन सांगितले असते. त्यामुळे ज्यांना जे वाटते ते लिहीत असतात.

सलमानला नाही मागितली मदत
त्याचबरोबर सलमानकडे तुम्ही  चित्रपटात गाणे गाण्यासाठी  कोणती मदत मागितली होती का ? असे विचारले असता  त्यांनी म्हटले कि, मी कुणालाही काहीही बोललेले नाही, सलमानलाच काय मी अजूनपर्यंत हिमेश रेशमियाकडे देखील काही मागितलेले नाही. तसेच मी या संधीसाठी त्यांचे आभार मानते.

सुपरस्टार होण्यापासून कुणी रोखू शकणार नाही

त्याचबरोबर त्यांनी हिमेश रेशमिया याच्या हॅप्पी हार्डी आणि हिर या सिनेमामध्ये गाणे देखील गायले आहे. या सिनेमासाठी त्यांनी तीन गाणे रेकॉर्ड केले आहेत. त्यामुळे त्यांना सुपरस्टार होण्यापासून कुणीही रोखू शकत नसल्याचे हिमेश रेशमिया याने सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like