‘कंगना’, ‘कश्यप’नंतर आता साहिल खानचा धक्कादायक ‘खुलासा’, म्हणाला – ‘गेल्या 20 वर्षात नवीन स्टारला येऊ दिलं नाही, मलाही अनेक सिनेमातून काढलं’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आता घराणेशाहीचा मुद्दा जोरावर आहे. अनेकजणांचं म्हणणं हे की, बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी इंडस्ट्रीत टिकणं काही लोक मुश्किल करत आहेत. इतकंच नाही तर इतरही अनेक लोक बोलते झाले आहेत आणि आपले इंडस्ट्रीतले अनुभव सांगत आहेत. स्टाइल सिनेमातून बॉलिवूड डेब्यू करणाऱ्या अभिनेता साहिल खान यानंही त्याची स्टोरी सांगितली आहे. मोठ्या स्टार्सनं त्याला कसं साईड लाईन केलं हे त्यानं सांगितलं आहे.

साहिलनं त्याच्या इंस्टारून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानं पोस्टमध्ये एका मासिकाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत साहिल शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यासोबत दिसत आहे. या मासिकात लिहिलंय की, टाऊनमध्ये नवीन खान.

साहिलनं आपल्या पोस्टमधून अप्रत्यक्षपणे साऱ्यांवर निशाणा साधला आहे. साहिलनं लिहलं की, “खूप कमी लोकांसोबत असं होतं की, पहिला स्टाइल सिनेमानंतर इंडियाच्या टॉप फिल्म मॅगेझिनच्या कव्हरवर. इंडियातील सर्वात मोठ्या दोन सुपरस्टारसोबत. परंतु त्यांच्यातील एका सुपरस्टारला मात्र वाईट वाटलं. परंतु मी तर नवीन होतो, त्यांचा चाहता होतो, कमजोर होतो.”

आपल्या पोस्टमध्ये पुढं बोलताना साहिल लिहतो, “असं असूनही ते अनेकदा मला साईड रोलसाठी बोलवत असत. मला अनेक टीव्ही शोमध्ये बोलवत असे. अनेक सिनेमातून मला त्यांनी काढलं होतं. नाम बडे और दर्शन छोटे. गेस करा कोन ? मला आज काहीच फरक पडत नाही. कारण सुशांत सिंह राजपूतनं त्यांचा खरा चेहरा दाखवून दिला आहे. जगातील ते लोक जे नव्या टॅलेंटला किती घाबरतात. गेल्या 20 वर्षात जॉन अब्राहम व्यतिरीक्त मोठा स्टार कोणताच आला नाही. कारण कोणी येऊच देत नाही. फक्त मोठ्या स्टार्सच्या मुलांना काम मिळतं. याबद्दल जरा विचार करा.”