Video : ‘किंग’ शाहरुख खानची पत्नी गौरी आणि मुलगा अबराम झाले चर्चबाहेर ‘स्पॉट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार शाहरुख खानची पत्नी गौरी खान आणि मुलगा अबराम मुंबईतील माउंट मेरी चर्चच्या बाहेर स्पॉट झाले आहेत. दोघेही माउंट मेरी चर्चमध्ये रविवारी झालेल्या मॉसमध्ये भाग घेऊन परत येत होते. यावेळी अबरामने टी शर्ट आणि शॉर्ट घातली होती. या वेशात तो खूपच क्युट दिसत होता.

यावेळी गौरी खाननेही मुलगा अबरामप्रमाणेच टी शर्ट घातला होता. तर केस पोनी स्टाईलमध्ये बांधले होते. सोबतच कूल दिसण्यासाठी गौरीने शेड्सही लावल्या होत्या. चर्चमध्ये झालेल्या संडे मॉसला अटेंड केल्यानंतर दोघेही फोटो घेणाऱ्या पत्रकारांना पोज देत होते. गौरी आणि अबराम दोघेही खूप खुश दिसत होते.

एका मुलाखतीत मुलगा अबरामबद्दल बोलताना शाहरुख खान म्हणाला होता की, मुलगा अबराम त्याच्या खूप क्लोज असून तो अबराम सोबत खूप टाईमही स्पेंड करतो. दोघे अनेकदा अनेक प्रकारचे खेळही खेळतात. शाहरुखला वाटतं की, अबराम त्याच्यासोबत जास्त एन्जॉय करतो. हे खेळ शाहरुख आर्यन आणि सुहानासोबतही खेळला आहे. पंरतु अबराम याला सर्वात जास्त एन्जॉय करतो असे शाहरुख म्हणाला.

लवकरच रिलीज होणाऱ्या द लायन किंग या सिनेमात शाहरुख खानचा मुलगा आर्यन आणि शाहरुखने दोन भूमिकांना आपला आवाज दिला आहे. या भूमिकांपैकी एका भूमिकेचे नाव मुसाफा आहे तर दुसऱ्याचे सिंबा आहे. 19 जुलै रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या